कांद्याच्या पातीची भाजी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कांद्यची पात स्वच्छ धुवून एफ करून घ्यावी
- 2
चणा डाळ भिजत ठेवावी इतर साहित्य बारीक चिरू घ्यावं. कांदापात हि बारीक चिरून घ्यावी
- 3
आता कढईत तेल गरम झाल्यावर त्यात मिरची आणि कांद्याचा पांढरा भाग घालून परतावे मग त्यात डाळ घालून पुनः परतून झाकण ठेवून २ मिनिटं डाळ शिजू द्यावी
- 4
आता झाकण काढून यात टोमॅटो घालावा मीठ घालावे आणि उरलेली कांदापात घालूं मिश्रण एकत्र करावे
- 5
५ मिनिटे मध्यम आचेवर परतून भाजी शिजलंकी चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
कांद्याच्या पातीची भाजी
#lockdown lokdown मध्ये पहिजे ती भाजी मिळेलच असे नाही.. आज कांद्याच्या पातीची भाजी केली. कांद्याच्या पातीची भाजी चवीला पण छान आणि शरीराला, ह्या तयार भाजीत बेसन घालून कांद्याच्या पातीचा झुणका ही होतो. कांद्याच्या पतीचा कांदा आणि गूळ हे ही चांगले लागते. नक्की ट्राय करा. Veena Suki Bobhate -
-
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4... हिवाळा म्हटला की हिरवे पातीचे कांदे,खाण्याची मजा येते. मग याच कांद्याच्या पातीचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केल्या जातो. मी ही आज कांद्याच्या पातीची भाजी केली आहे. पण ही कांद्याची पात वेगळी आहे. म्हणजे गावाकडे कांद्याची लावणी केल्यावर, त्याला जी पात येते, ती कोवळी, लुसलुशीत पात खुडून आणतात. आणि त्याच्या गड्ड्या बनवून, गावात विकल्या जातात. योगायोगाने, आईने, कालच, ही पात गावाहून आणल्याने, त्याच कोवळ्या लुसलुशीत पातीची भाजी केली मी आज.. खूपच चविष्ट झाली आहे... Varsha Ingole Bele -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#week4 " कांद्याच्या पातीची भाजी"चना डाळ घालून अतिशय चविष्ट होते ही भाजी..सिजन मध्ये आम्ही नेहमीच बनवतो. आणि आवडीने खातो.. कांद्याची पात घालून पिठलं, पीठ पेरून भाजी, झुणका, लाल तिखट घालून भाजी, हिरवी मिरची लसूण घालून भाजी.. अशा अनेक प्रकारे भाजी बनवू शकतो.. आवडीनुसार..मी हिरवी मिरची लसूण घालून बनवली आहे.. त्यामुळे भाजीचा रंग हिरवागार राहातो आणि टेस्टी होते.. लता धानापुने -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4 साठी हि रेसिपी मी बनवत आहे Asha Thorat -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#W4लांब लांब हिरवीगार पात सर्वांना खूप आवडते.भाजी तर टिफीन ल सुध्दा छान आहे.:-) Anjita Mahajan -
सुकट घालून कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#W4 kalpana Koturkar -
कांदा पातीची भाजी
ही भाजी मधुमेही साठी एकदम उपयुक्त आहे. #goldenapron3 #week5 #keywordsabji Mrs. Sayali S. Sawant. -
कांद्याच्या पातेची भाजी (kandyachya patechi bhaaji recipe in marathi)
#GA4 #week11#greenonion Swati Ghanawat -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4: हिवाळ्यात भाजी बाजारात हिरवे पालेभाज्या पण भरपूर दिसतात .ओलेकांदे आणि ते पण पातीवाले ,खूप झणझणीत चवीष्ट आणि पोस्टिक भाजी बनते. Varsha S M -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुक Week 4# कांद्याची पात 😋😋😋 Madhuri Watekar -
-
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4हिरव्या हिरव्या कांद्याची पात मिळणं सुरू झालं की भरीत मध्ये, कोशिंबीर मध्ये मस्त लागते...याचीच भाजी छान लागते... Shital Ingale Pardhe -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#W4#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज#कांद्याच्या_पातीची_भाजीलव लव करी पातं...🌱🌱🌱🌱 थंडीची चाहूल लागताच धरणीमातेच्या उदरातून कांद्याचे इवलेसे इटुकले पिटुकले पोपटी कोंब बाहेर पडायची धडपड करत डोळे विस्फारुन जणू दोन्ही हात फैलावत 🌱🌱आजूबाजूचे निसर्गसौंदर्य न्याहाळतात आणि आपल्या आगमनाची वर्दी देत अवनीवर गर्भारेशमी हिरवी पोपटी शालूच पांघरतात..तेव्हां त्यांच ते सौंदर्य पाहून "लव लव करी पातं..डोळं नाही थार्याला.. पाहू कसं एकटक..,"..अशीच काहीशी अवस्था होते आपली..यथावकाश ही धाकली पाती तरारुन मोठी पाती झाली की शेतातून थेट आपल्या घरात आपल्या सेवेसाठी हजर होतात..त्यांच ते हिरवकंच सौंदर्य पाहून आधी आपल्याला नेत्रसुख तर मिळतंच शिवाय नंतर आपल्या अंगभूत चवीने आपली जिव्हां देखील तृप्त करते ही कांद्याची पात.. चला तर मग अगदी मोजकंच साहित्य वापरुन कांदा पातीची मूळ चव राखत ही भाजी करु या.. Bhagyashree Lele -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4कोवळी पात त्याच्या कांद्यासकट बारीक चिरून बेसन पेरून भाजी एकदम सुंदर होते Charusheela Prabhu -
-
कांद्याच्या पातीची भाजी
#lock down 16आज खूप दिवसांनी हिरवी गार कांद्याची पात मिळाली बाजारात दुपारच्या जेवणाचा बेत ठरला Prachi Manerikar -
-
अंड्याचा ऑमलेट (egg omlet recipe in marathi)
#GA4#week2#Omeletteहा तसा साधा ऑमलेट आहे पण माझ्या मिस्टरांचा फेवरेट आहे. कधीही इच्छा झाली किंवा आवडीची भाजी नसली की लगेच हा ऑमलेट बनवतो. Pallavi Maudekar Parate -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#week4#विंटर स्पेशल रेसिपी#कांद्याच्या पातीची भाजीहिवाळ्यात भरपुर प्रमाणात पातीचा कांदा मिळतो त्यासाठी खास भाजीची रेसपी..... Shweta Khode Thengadi -
मुगाची डाळ घालून कांद्याची पात (moongachi dal ghalun kandyachi pat recipe in marathi)
#EB4 #W4 कांद्याची पात हा की वर्ड घेऊन मुगाची डाळ घालून कांद्याच्या पातीची भाजी केली.भाकरीसोबत इतकी सुंदर लागते...मस्तच.. Preeti V. Salvi -
-
-
कांद्याच्या पात व फुलकोबी ची भाजी (kandapaat ani fulgobi bhaji recipe in marathi)
हिरवी हिरवी कांद्याची पात खुपच छान वाटते, कोणत्याही भाजीत आपण ती वापरू शकतो. आज फुलकोबी ची नूसतीच भाजी बनविण्यापेक्षा कांद्याची पात मिक्स भाजी केली, Pritibala Shyamkuwar Borkar -
कांदयाची पात घालून केलेली शेव भाजी (kandyachi pat sev bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात रोज रोज काय भाजी बनवायची हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो. आणि त्यात घरात कधी भाजी नसेल तर त्यासाठी कमी वेळात झटपट होणारी आणि तितकीच खमंग अशी ही शेव भाजी हा उत्तम पर्याय आहे. इथे मी शेव भाजी कांद्याची पात घालून बनवलेली आहे. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कांदापातीची भाजी (kandapatichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4कांदा पात पाहूनच मंडईत गेलं की अगदी घ्यावीशी वाटणारी भाजी!खरं म्हणजे ही भाजी जेवढी बारीक चिरावी तेवढी मस्त होते.सूपमध्ये,चायनीजमध्ये अगदी आवश्यक होऊन बसलेली ही भाजी....पण आपल्याकडे तर पूर्वापार चालत आलेली.गरम भाकरीबरोबर खायची मजा औरच!पीठ पेरून करावी तर कमी पडते ...शिजवली/परतली की कमी होते.मला पूर्वी पुण्यात डेक्कन जिमखान्यावर एकदम श्रीमंत एरियात जी अगदी खूप स्वच्छ केलेली अशी कांदापात मिळायची तिचे खूप आकर्षण होते.त्यावेळी मी कॉलेजला होते.तिथेच माझा अकाउंट्सचा क्लास होता आणि समोरच पालेभाज्यांच्या स्टॉलवरची ही कांदापात मला अगदी आकर्षित करायची!तेव्हा....म्हणजे 1983-84ला10रुपयाला (तेव्हा दहा रुपये हे खूपच महाग वाटायचे)ही भाजी घरी नेऊन बाबांची बोलणी खाल्ली आहेत 🤨पुण्यातल्या म.फुले मंडईतही जी जुनी दगडी इमारत आहे तिथल्याही स्टॉलवर म्हणजे आतल्या मंडईतही ही कांदापात अशीच स्वच्छ केलेली ... पण महाग मिळते....आता सिंहगडरोडवर तर शेतातली ताजी काढून आणलेली कांदापात सहज दहा रुपयाला मिळते(स्वस्त!!😄)पातीचा कांदा आणि पात नुसते तेल ,तिखट,मीठ घालूनही चवीला मस्त लागते.चंपाषष्ठीला आमच्या गावी जेवायच्या पानापाशी ही एकेक कांदापात ठेवली जायची व त्या दिवसापासून कांदा खाण्यास सुरुवात करायची व चातुर्मास समाप्ती व्हायची.. असे माझे बाबा नेहमी सांगायचे.आता अष्टौप्रहर कांदा लागतो.तामसी वृत्ती व रजोगुण वाढवणारा हा कांदा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.आजची कांदापातीची भाजी....हरभरा डाळ घालून....बघा,आवडतेय का!😊😋😋 Sushama Y. Kulkarni -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11641411
टिप्पण्या