रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

1 तास
3-4 सर्व्हिंग्ज
  1. सारणासाठी लागणारे साहित्य
  2. 100 ग्रॅम कोबी
  3. 50 ग्रॅम कोथिंबिर
  4. 2कांदा
  5. 1 टीस्पूनमिरची च पेस्ट
  6. 1 टीस्पूनलसूण च पेस्ट
  7. 1 टीस्पूनअद्रक च पेस्ट
  8. 3-4 टीस्पूनसोयाबीन ची पेस्ट
  9. 1/2 टीस्पूनतेल
  10. 1 टीस्पूनबटर
  11. 1 टीस्पूनमॅगी मसाला
  12. चवीपुरत मीठ
  13. मोमोच्या पारीसाठी लागणारे साहित्य..
  14. 2 वाटीमैदा
  15. 1 टीस्पूनतेल
  16. चवीपुरत मीठ
  17. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वात पहिले कोबी, कांदा, कोथिंबीर, लसूण, अद्रक, बारीक कापून घेऊ. मग मिक्सर च्या भाड्यात 10-15 सोयाबीन घालुन फिरुन घेणे. एक बाऊलमध्ये मैदा, मीठ, तेल एकत्र मीक्स करुन त्यात पाणी घालून पीठ घट मळून घ्यावे. मळलेले पीठ 10-15 मिनिटे झाकून ठेवा.

  2. 2

    गॅसवर तवा गरम करुन त्या मध्ये 1/2 टीस्पून तेल आणि 1 टीस्पून बटर घाला. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्या मध्ये मिरची च पेस्ट, लसूण, अद्रक घालुन परतुन घ्या. मग त्यात कांदा, कोबी, कोथिंबीर घालून व्यवस्थित परतून घ्या.

  3. 3

    त्यानंतर चवीपुरत मीठ, मेगी मसाला घालुन परतून घ्या. परतून झाल्यावार त्यामध्ये सोयाबीन चे पेस्ट घालुन व्यवस्थित 3-4 मिनिटे परतून घ्या. लक्षात असू द्या सारण ड्राय झाले पाहिजे.

  4. 4

    भिजवलेल्या मिश्रण थंड झाल्यावर. पीठ पुणा एकदा मळुन घ्या. आणि पिठाचे गोळे करुन चपाती पातळ लाटून घ्यावी. त्यात स्टफींग भरून मोमोजचे विविध शेप देऊन सर्व मोमोज तयार करून घ्यावे.

  5. 5

    इडली पात्रात पाणी उकळवत ठेवावे. इडली स्टॅंडला तेलाचा हात लावावा. त्यावर मोमोज ठेवून १०-१२ मिनिटे वाफवून घ्यावे. ५ मिनिटांनी इडली पात्र उघडून मोमोज काढावेत.

  6. 6

    गरमागरम मोमोज चिली सॉस किंवा शेजवान सॉस,चटणी बरोबर सर्व्ह करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
रोजी
Central America
i am house wife and i love cooking..🍴🍽
पुढे वाचा

Similar Recipes