पनीर भुर्जी (paneer bhurgi recipe in marathi)

Shital shete
Shital shete @Shital_123
Pune

शाकाहारी लोकांसाठी काही विशेष चमचमीत बनवायचं असेल तर सगळ्यात आधी येते ते पनीर. शिवाय पनीर हा प्रोटीन चा एक चांगला सोर्स ही आहे. पनीर भुर्जी हा पनीर चा झटपट होणारा पण चमचमीत पदार्थ आहे. टिफिन साठी किंवा मुलांना द्यायला हा खूप छान आहे.

पनीर भुर्जी (paneer bhurgi recipe in marathi)

शाकाहारी लोकांसाठी काही विशेष चमचमीत बनवायचं असेल तर सगळ्यात आधी येते ते पनीर. शिवाय पनीर हा प्रोटीन चा एक चांगला सोर्स ही आहे. पनीर भुर्जी हा पनीर चा झटपट होणारा पण चमचमीत पदार्थ आहे. टिफिन साठी किंवा मुलांना द्यायला हा खूप छान आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटे
4 सर्व्हिंग्स
  1. 2 कपकिसलेले पनीर
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2-3हिरव्या मिरच्या
  5. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. 1 टीस्पूनधने जिरे पावडर
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. 1/2 टीस्पूनलिंबू रस
  11. 1/2 टीस्पूनसाखर
  12. चवीनुसार मीठ
  13. 2 टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
  14. 3 टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    कढाई मध्ये दोन टेबल्स्पून तेल गरम करा त्यामध्ये जिरे व मोहरी घाला. जिरे मोहरी तडतडली की बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला.

  2. 2

    कांदा लालसर झाला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घाला. दोन ते तीन मिनिटे परतून घ्यावा व त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घाला टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.

  3. 3

    आता यामध्ये हळद,लाल मिरची पावडर गरम मसाला, धने जिरे पावडर घाला. व्यवस्थित मिक्स करून घ्या व पनीर घाला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  4. 4

    दोन ते तीन चमचे पाणी घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या यामध्ये चवीनुसार मीठ साखर आणि लिंबू रस घाला.

  5. 5

    झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून दोन मिनिटे परतून घ्या. चमचमीत पनीर भुर्जी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital shete
Shital shete @Shital_123
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes