तडकेवाली डाळ पालक (tadkewali dal palak recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

पालक आणि डाळी दोन्ही पण आरोग्यासाठी खुपच चांगले....मी पालक पनीर साठी पालक आणला त्यातली एक जुडी उरली होती. डाळ पालक आणि पालक पनीर घरात आवडीने खाल्ले जातात.
रोजच्या डाळी पेक्षा वेगळी डाळ ती पण टेस्टी आणि आरोग्यासाठी उत्तम.... नक्की करून पाहा.

तडकेवाली डाळ पालक (tadkewali dal palak recipe in marathi)

पालक आणि डाळी दोन्ही पण आरोग्यासाठी खुपच चांगले....मी पालक पनीर साठी पालक आणला त्यातली एक जुडी उरली होती. डाळ पालक आणि पालक पनीर घरात आवडीने खाल्ले जातात.
रोजच्या डाळी पेक्षा वेगळी डाळ ती पण टेस्टी आणि आरोग्यासाठी उत्तम.... नक्की करून पाहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
4-5 जणांसाठी
  1. 1जुडी पालक बारीक चिरलेला
  2. 1 कपचना डाळ
  3. 1/2 कपतूर डाळ
  4. 1/2 कपमूग डाळ
  5. 10-12लसूण पाकळ्या बारीक चिरून
  6. 1 टीस्पूनजिरे
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 1 टीस्पूनतेल
  9. 6-7कडीपत्ता पाने
  10. 1/2 टीस्पूनहिंग
  11. 1/2 कपबारिक चिरलेला कांदा
  12. 1/2 कपबारिक चिरलेला टोमॅटो
  13. 1/2 टीस्पूनहळद
  14. 1 टीस्पूनलाल तिखट
  15. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  16. 1 टीस्पूनधने जिरे पावडर
  17. चवीनुसार मीठ
  18. 2 कपपाणी
  19. तडक्या साठी साहित्य
  20. 1 टीस्पूनतेल
  21. 5-6पाकळ्या लसूण
  22. 2लाल सुक्या मिरच्या
  23. 1/2 टीस्पूनलाल तिखट

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    डाळ पालक बनवण्यासाठी साठी तिन्ही डाळी स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवा. 2 तासानंतर एका कुकर मध्ये 1 टीस्पून तेल टाकून त्यातजिरा मोहरी टाका ती तडतडली कि त्यात हिंग, कडीपत्ता, चिरलेली लसूण टाका मग त्यात कांदा टाका तो चांगला भाजला की त्यात टोमॅटो टाका 2-3 मिनिटे परतवून त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर टाका व तेल सुटेपर्यंत परतवा.

  2. 2

    आता त्यात डाळ टाका व पाणी टाकून मिक्स करा. चवीप्रमाणे मीठ टाकून कुकर च झाकण लावून 5 शिट्या करा.

  3. 3

    कुकर थंड झाला की झाकण उघडून मिडीयम फ्लेम वर त्यात चिरलेला पालक टाका एक उकळी आली की गॅस बंद करा. आता तडका पॅन मध्ये तेल टाका तेल चांगले गरम झाले की त्यात मिरची लसूण व लाल तिखट टाका व डाळी वर तो तडका टाकुन मिक्स करा. ही डाळ रोटी, चपाती, रईस सोबत खूप मस्त लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes