मेक्सिकन राईस नाचोज विथ  साल्सा डीप (mexican rice nachos with salsa recipe in marathi)

Shital shete
Shital shete @Shital_123
Pune

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी. मेक्सिकन राईस नाचोज एक मेक्सिकन स्नॅक्स चा प्रकार आहे. कुरकुरीत नाचोज संध्याकाळी चहा सोबत किंवा मुलांना मधल्या वेळी द्यायला खूप छान प्रकार आहे. शिवाय साल्सा डीप सोबत याची मजा आणखी वाढते. करायला एकदम सोपे आणि कुरकुरीत मसालेदार नाचोज खूप दिवस टिकतात.

मेक्सिकन राईस नाचोज विथ  साल्सा डीप (mexican rice nachos with salsa recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी. मेक्सिकन राईस नाचोज एक मेक्सिकन स्नॅक्स चा प्रकार आहे. कुरकुरीत नाचोज संध्याकाळी चहा सोबत किंवा मुलांना मधल्या वेळी द्यायला खूप छान प्रकार आहे. शिवाय साल्सा डीप सोबत याची मजा आणखी वाढते. करायला एकदम सोपे आणि कुरकुरीत मसालेदार नाचोज खूप दिवस टिकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-35 मिनिटे
4 सर्व्हिंग्स
  1. नाचो बनवण्यासाठी
  2. 1 कपतांदळाचे पीठ
  3. 1 कपपाणी
  4. चवीनुसार मीठ
  5. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  6. 1 टीस्पूनचाट मसाला
  7. 2 टीस्पूनचीझ पावडर
  8. साल्सा डीप बनवण्यासाठी
  9. 2 टेबलस्पूनघट्ट दही
  10. 1 टेबलस्पूनमेयॉनीज
  11. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेला कांदा
  12. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेला टोमॅटो
  13. 1/2 टीस्पूनक्रश काळी मिरी
  14. 1/2 टीस्पूनलसूण पेस्ट
  15. चवीनुसार मीठ
  16. चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

30-35 मिनिटे
  1. 1

    एका पातेल्यात एक कप पाणी गरम करा. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका पाण्याला उकळी आली की त्यामध्ये एक कप तांदळाचे पिठ टाका. व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून दहा मिनिटे झाकण ठेवून बाजूला ठेवून द्या

  2. 2

    हे उकडलेले पीठ थोडेसे थंड झाले की पाण्याचा हात ठेवून व्यवस्थित मळून घ्या. आता ह्या मळलेल्या पिठाचे दोन भाग करा व एक भाग पोळपाटावर ठेवून पोळी लाटून घ्या. हे पोळी नेहमीच्या चपाती किंवा पोळी पेक्षा थोडीशी जाडसर लाटावे. आता या पोळीच्या कडा कापून पोळीचे त्रिकोणी आकारात नाचोज कापून घ्या.

  3. 3

    त्यावर फोर्क च्या साहाय्याने टोचे मारून घ्या व गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

  4. 4

    आता एका डब्यात चीझ पावडर (चीझ पावडर नसेल तर मॅग्गी मसाला 1 टेबलस्पून) लाल मिरची पावडर चाट मसाला घाला. तळलेले नाचोस या डब्यात टाका. झाकण लावून हलक्या हाताने डबा हलवून घ्या. मसाला सर्व नाचोस ला व्यवस्थित लागला पाहिजे.

  5. 5

    साल्सा डीप बनवण्यासाठी एका वाटीमध्ये घट्ट दही घ्या. त्यामध्ये मेयॉनीज टाका. लसूण पेस्ट टाका.

  6. 6

    आता त्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो घाला. क्रश केलेली काळी मिरी घाला. व्यवस्थित मिक्स करा. साल्सा डीप तयार आहे.

  7. 7

    तयार नाचोस साल्सा डीप सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital shete
Shital shete @Shital_123
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes