साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

एकादशी दुप्पट खाशी..

उपवास म्हटलं की डोळ्यासमोर आधी येते साबुदाणा खिचडी..वसुधैव कुटुंबकम् म्हणत आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीने परदेशी पाहुणे असणार्या साबुदाणा ,बटाटा,मिरची यांना मोठ्या आपुलकीने जवळ केले आणि या पदार्थांनी एवढी भुरळ घातली आहे की ही मंडळी आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत जणू...एवढेच नव्हे तर उपवास या धार्मिक संस्कृतीत ध्रुवतार्यासारखे अढळ पद प्राप्त झालं आहे यांना..
त्यामुळेच उपवास आणि साबुदाणा यांचं समीकरण जुळलं ते कायमचचं जुऴलं..मऊ लुसलुशीत खमंग खिचडी न आवडणारा माणूस विरळाच..तरी पण कधी कंटाळा आला तर..म्हणजे आपल्या जिभेचे चोचले हो.. साबुदाण्याची खीर कर ,साबुदाण्याच्या पापड्या तळ,चकल्या तळ..नाहीतर खमंग खरपूस साबुदाणा वडा कर..अगदीच तळकट नको असेल तर साबुदाणा वड्याचे आप्पे कर...सगळा या 4 इंच जिभेचा महिमा ..हम्म्म्....
चला तर मग स्वादिष्ट,खमंग साबुदाणा वडा तयार करुन या जिभेचा महिमा द्विगुणित करु या..😀

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

40-50 मिनीटे
4 जणांना
  1. 2 कपसाबुदाणा
  2. 1 कपशेंगदाणा कुट
  3. 4-5उकडलेले बटाटे
  4. 2-3 टेबलस्पूनआलं मिरची कोथिंबीर जिरे पेस्ट
  5. 1 चमचा साखर
  6. चवीनुसार मीठ
  7. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. तळण्यासाठी तूप किंवा तेल
  9. चटणीसाठी:-
  10. 4 टेबलस्पूनदाण्याचा कूट
  11. 1 इंचआले
  12. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  13. 1 टीस्पूनजिरे
  14. 1 चमचासाखर
  15. चवीनुसार मीठ
  16. 1 टेबलस्पूनदही
  17. पाणी
  18. 4-5हिरव्या मिरच्या
  19. 1 टेबलस्पूनओलं खोबरं

कुकिंग सूचना

40-50 मिनीटे
  1. 1

    प्रथम साबुदाणा स्वच्छ धुऊन घ्यावा आणि तो पाण्यात 7-8तास भिजवून ठेवा. साबुदाण्याच्या वर एक पेर राहील एवढे पाणी ठेवा.

  2. 2

    बटाटे उकडून मॅश करून घ्या. आलं मिरची कोथिंबीर जिरे यांची पेस्ट करून घ्या.

  3. 3

    आता एका परातीत साबुदाणा काढून घ्या आणि त्यात दाण्याचा कूट, आलं मिरची जिरं पेस्ट, उकडलेले बटाटे, साखर चवीनुसार मीठ भरपूर कोथिंबीर घालून मिश्रण चांगले एकजीव करा. मिश्रण जर कोरडे वाटले तर पाण्याचा हात लावून मळून घ्या. आता याचे गोल,चपटे साबुदाणे वडे थापून घ्या.

  4. 4

    तिकडे कढईत तेल किंवा तूप तापत ठेवा गॅस लो टू मिडीयम आचेवर ठेवा. आता तयार केलेले साबुदाणे वडे खमंग खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्या.

  5. 5

    चटणीसाठीचे दिलेले साहित्य मिक्सरमध्ये फिरवून घ्या. चटणी कितपत घट्ट किंवा पातळ हवीअसेल त्यानुसार पाणी घालून मिक्सर मधून फिरवून घ्या.

  6. 6

    अशा तऱ्हेने खमंग खरपूस तयार झालेले साबुदाणे वडे शेंगदाणा चटणी बरोबर सर्व्ह करा.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes