बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#अन्नपूर्णा
बेसनाचे लाडू ...
मस्त तुपात बनवलेले आणि मऊसूत
न बसणारे, एकदम परफेक्ट
तोंडात विरघळणारे

बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)

#अन्नपूर्णा
बेसनाचे लाडू ...
मस्त तुपात बनवलेले आणि मऊसूत
न बसणारे, एकदम परफेक्ट
तोंडात विरघळणारे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कप आणि 4 टेस्पून तूप
  2. 3 कपबेसन / हरभरा पीठ, खरखरीत
  3. 2 कपपिठीसाखर
  4. 1 आणि 1/2 टेस्पूनवेलची पूड
  5. 5-6काजू तुकडे
  6. पिस्ता

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    पॅनमध्ये तूप गरम करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये सोनेरी रंगाचे होईपर्यंत बेसन पीठ मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे.

  2. 2

    बेसन पीठ चांगले भाजून सोनेरी रंगाचे झाल्यावर त्यावर 2 चमचे पाणी हातावर घेऊन पाण्याचा हबका द्यावा त्यामुळे बेसन पीठ चांगले फसफसून वर येते आणि दाणेदार बनते.

  3. 3

    एका मोठ्या पसरट भांड्यात बेसन पीठ काढून घ्यावे गरम असताना त्यामध्ये वेलची पावडर आणि काजूचे तुकडे घालावे ते नीट मिक्स करून थंड होऊ द्यावे त्यानंतर त्यामध्ये पिठीसाखर थोडे थोडे करून मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    पिठी साखर मिक्स केल्यानंतर ही मिश्रण अर्धा तास झाकून घ्यावे त्यानंतर लाडू बांधायला घ्यावेत लाडू छानपैकी वळले जातात बसत नाहीत मस्त खाताना तोंडातच विरघळतात.

  5. 5

    लाडूला सजवण्यासाठी वरती पिस्त्याचे काप लावावे, सुंदर दिसतात. लाडू मिश्रणाला मोदकाच्या साच्यामध्ये घालून त्याचे मोदकही बनवू शकता,आपले बेसनाचे लाडू तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes