खान्देशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#EB1
#W1

अतिशय सोपी, सुटसुटीत कोणत्याही तयारीची फारशी गरज नसलेली आणि तरीही चवीला अप्रतिम,...
उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणारी भन्नाट अशी ही *शेवभाजी*...
पाहुणे आल्यास झटपट करण्यासाठी भाजीचा उत्तम पर्याय म्हणजे खान्देशी पद्धतीने बनवलेली शेव भाजी.... ही भाजी छोट्या पासून ते मोठ्यांपर्यंत अगदी बोलायचे झाले तर म्हातार्‍या पर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी शेव भाजी....
मला नक्की विश्वास आहे ही भाजी खाल्ल्यावर पनीरची भाजी देखील तुम्ही विसरून जाल.. सामान्यता शेवभाजी ही खान्देशी डिश.. विशेषतः जळगाव मधील सर्वात लोकप्रिय आणि चवदार असलेली पाककृती...
चला तर मग करुया *खान्देशी शेवभाजी*.... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
4 लोक
  1. 1 कपजाड नमकिन शेव
  2. 2मोठे कांदे
  3. 1/2 इंचअदरक चा तूकडा
  4. ८-१० लसूण पाकळ्या
  5. 1छोटे टमाटर (ऑप्शनल)
  6. कोथिंबीर
  7. 1/4 कपखोबराकिस
  8. 1/4 कपतेल
  9. 2 टेबलस्पूनतिखट (तूमच्या सोयीनुसार कमी जास्त करु शकता)
  10. 1/4 टीस्पूनहळद, हिंग
  11. 1/2 टेबलस्पूनधनेपावडर
  12. जिरापावडर
  13. 1/2 टेबलस्पूनकश्मीरी लाल तिखट ( भाजी ला रंग येण्यासाठी
  14. 1-2 टेबलस्पूनखान्देशी काळा मसाला / गरम मसाला /सावजी मसाला
  15. आवश्यकतेनुसार गरम पाणी
  16. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    पॅनमध्ये तेल करावे. तेल गरम झाले की त्यामध्ये चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईस्तोवर तळून घ्यावा. त्यासोबतच खोबऱ्याचे पातळ काप घालावे व कांदा व खोबरे खरपूस कुरकुरीत रंग येईपर्यंत तळून घ्यावे.

  2. 2

    कांदा व खोबरे थंड झाले की मिक्सरच्या पॉटमध्ये घालावे व त्यातच आल्याचा तुकडा, दहा ते बारा लसूण पाकळ्या, टमाटर चे काप (ऐच्छिक) कोथिंबीर, थोडीशी जाड शेव (यामुळे रस्सा ताट होतो व रस्सायाला चांगली चव येते) घालून वाटण तयार करून घ्यावे. आवश्यकता असल्यास थोडेसे पाणी वाटणात घालू शकता.

  3. 3

    ज्या तेलात कांदा तळला त्यातच तयार केलेले वाटण घालावे. थोडे पाणी घालून वाटण चांगले परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये बाकीचे सर्व सुके मसाले म्हणजे तिखट, धने पावडर, जीरे पावडर, हिंग, काश्मिरी लाल तिखट (रंग येण्यासाठी) हळद, खानदेशी काळा मसाला/ घरगुती गरम मसाला/ सावजी मसाला(यापैकी कुठल्याही मसाला) घालावा. चांगले मिक्स करून, तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यावा. दोन मिनिट परतल्या नंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालावे. रस्सा थोडा पातळ ठेवावा. कारण शेव घातल्यावर रस्सा घट्ट होतो.

  4. 4

    चवीनुसार मीठ घालावे व रस्सायाला उकळी येऊ द्यावी. रस्सायाला उकळी आली की गॅस बंद करावा. व वरून कोथिंबीर घालावी.

  5. 5

    तयार आहे आपला शेव भाजी साठी लागणारा रस्सा...
    खायला देताना वाटीत शेव त्यावर गरम गरम रस्सा, थोडीशी कोथिंबीर आणि सोबत थंड गार मठ्ठा देऊन सर्व्ह करावे...
    ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भातासोबत, रोटीसोबत, ब्रेड सोबत सर्व्ह करू शकता..
    तेव्हा नक्की ट्राय करा *खान्देशी शेव भाजी*... 💃 💕

  6. 6
  7. 7
  8. 8

    टिप.. रस्साभाजीत मीठ थोडे कमीच घालावे. कारण शेव मध्ये देखील मीठ असते.
    २) कांदा खोबरे खरपूस तळून घेतल्याने भाजीला खूप छान चव आणि रंग येतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes