शेव भाजी (shev bhaji recipe in marathi)

जान्हवी आबनावे
जान्हवी आबनावे @cook_27681782

#लंच
#साप्ताहिक_लंच_प्लॅनर
#शेवभाजी
शेव भाजी ही सुखी आणि रस्सा दोन्ही स्वरूपात केली जाते. रस्सा बरोबर पाव किंवा ब्रेड तसेच भाकरी खाऊ शकतो. आज मी खान्देशी शेव भाजी केली आहे.
चला तर मग रेसिपी बघुया 😊👇

शेव भाजी (shev bhaji recipe in marathi)

#लंच
#साप्ताहिक_लंच_प्लॅनर
#शेवभाजी
शेव भाजी ही सुखी आणि रस्सा दोन्ही स्वरूपात केली जाते. रस्सा बरोबर पाव किंवा ब्रेड तसेच भाकरी खाऊ शकतो. आज मी खान्देशी शेव भाजी केली आहे.
चला तर मग रेसिपी बघुया 😊👇

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. 1 कपशेव,
  2. 2कांदे मोठे तुकडे करून,
  3. 1/2 कपसुके खोबरे,
  4. 8/10लसूण पाकळ्या,
  5. 1 इंचआल,
  6. कोथिंबीर,
  7. 7/8कढीपत्ता,
  8. 1/4 टीस्पूनहळद,
  9. 1 टेबलस्पूनकाश्मिरी तिखट कलरसाठी,
  10. 1 टीस्पूनकाळा मसाला,
  11. 1/2 टीस्पूनगरम मसाला,
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    खोबरे,कांदा भाजून घ्यावे. त्यात लसूण, आल थोडी कोथिंबीर घालून वाटण करून घ्यावे.

  2. 2

    कढईत तेल गरम करून कढीपत्ता घालावा, वाटण घालून परतून घ्यावे, हळद घालावी, काश्मिरी तिखट, काळा मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

  3. 3

    मसाला छान परतून झाला कि पाणी घालून झाकून छान रस्सा शिजवून घ्यावे.

  4. 4

    गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून ऊकळी आणावी. वरून कोथिंबीर घालावी. गॅस बंद करून वाफ गेल्यावर शेव घालावी. शेव भाजी तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
जान्हवी आबनावे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes