डींक लाडू (dink laddu recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#EB4 #W4

डींक लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टीक आहेत. डिंक लाडू मुळे हाडांना मजबुती मिळते. नवमाता व गरोदर महिलांसाठी डिंक लाडू हे सर्वात पौष्टीक आहेत. ह्हाया लाडूमुळे हाडे मजबूत राहतात आणि आपले आरोग्य ही चांगले राहण्यास मदत होते. ह्ड्रायात सुकामेवा वापरल्याने लहान मुलांची बुद्धीमत्ता वाढण्यास मदत होते. चला तर #winterspecial डींक लाडूची रेसिपी बघुया.

डींक लाडू (dink laddu recipe in marathi)

#EB4 #W4

डींक लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टीक आहेत. डिंक लाडू मुळे हाडांना मजबुती मिळते. नवमाता व गरोदर महिलांसाठी डिंक लाडू हे सर्वात पौष्टीक आहेत. ह्हाया लाडूमुळे हाडे मजबूत राहतात आणि आपले आरोग्य ही चांगले राहण्यास मदत होते. ह्ड्रायात सुकामेवा वापरल्याने लहान मुलांची बुद्धीमत्ता वाढण्यास मदत होते. चला तर #winterspecial डींक लाडूची रेसिपी बघुया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमखारीक पुड
  2. 250 ग्रॅमकिसलेल खोबर
  3. 250 ग्रॅमपारदर्शक डिंक
  4. 100 ग्रॅमबदाम
  5. 100 ग्रॅमकाजु
  6. 100 ग्रॅममनुका
  7. 50 ग्रॅमखसखस
  8. 50 ग्रॅमगोडंबी
  9. 250 ग्रॅमबारिक चीरलेला गुळ
  10. 250 ग्रॅमसाजुक तुप
  11. 2 टेबलस्पूनपाणी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    डींक व्यवस्थित निवडून एका बाऊलमधे थोड तुप घालून त्यात डींक घालून Microwave मधे 1मिनिट high-power वर डींक फुलवून घ्यावा.

  2. 2

    आता कढईत 4 टेबलस्पून तुप घालून त्यावर खारिकपुड रंग बदलेपर्यंत परतून घ्यावी व एका मोठ्या पातेल्यात काढून घ्यावी. आता कढईत किसलेल खोबर कुरकुरीत होइपर्यंत भाजुन घ्यावे.

  3. 3

    काजु व बदामाचे काप करून घ्यावेत. आता कढईत तुपात ड्रायफ्रुट तळून घ्यावेत. मनुका तळून घ्याव्यात. गोडंबी तळून जरा जाडसर भरड करून घ्यावी. खसखस भाजून घ्यावी.

  4. 4

    आता मोठ्या पातेल्यात खारीकपुड,खोबर,डींक काजु,बदाम,मनुका,गोडंबी,खसखस हे सगळे साहित्य एकत्र करून व्यवस्थित हलवून घ्यावे. आता कढईत चिरलेला गुळ घालून 2 टेबलस्पून पाणी घालून गुळ वितळवून घ्यावा. वितळवलेल्या गुळाच्या पाकात साजुक तुप घालून एकत्र करून घ्यावे. आता तयार पाक खारिक खोबर,डींक व ड्रायफ्रुट च्या मिश्रणात घालून हलवून घ्यावे.

  5. 5

    हे मिश्रण गरम असतनाच लाडू बांधावेत कारण डींकामुळे व गुळामुळे मिश्रण पटकन कडक होवू शकते.

  6. 6

    थंडीत ऊबदारपणा देणारे पौष्टिक डींक ड्रायफ्रुट लाडू तयार. मस्त सकाळी एक लाडू आणि कपभर दूध घेतल की हेल्दी नाश्ता झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

Similar Recipes