गोड आणि तिखट चटणी

Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja

हलवाई कडून समोसा, ढोकळा अथवा कचोरी आणली की त्याच्यासोबत येणाऱ्या या दोन चटण्या आज मी केलेल्या आहेत. अगदी विकत आणतो तशाच या चटण्या चवीला लागतात.

गोड आणि तिखट चटणी

हलवाई कडून समोसा, ढोकळा अथवा कचोरी आणली की त्याच्यासोबत येणाऱ्या या दोन चटण्या आज मी केलेल्या आहेत. अगदी विकत आणतो तशाच या चटण्या चवीला लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
4 जणांसाठी
  1. गोड लाल चटणीसाठी साहित्य-
  2. 1tbs बडीशेप
  3. 1tbs जिरे
  4. 1/2tbs काळी मिरी
  5. 1/2tsp कसुरी मेथी
  6. 1/2tsp तुप
  7. चिमुटभरहींग
  8. 1/2tsp लाल तिखट
  9. दिड कप पाणी
  10. 1 कपसाखर
  11. 1/2 कपचिंचेचा कोळ
  12. 1/2tsp काळे मिठ
  13. तिखट हिरव्या चटणीसाठी साहित्य-
  14. 2छोट्या जुड्या कोथिंबीर
  15. 2छोट्या जुड्या पुदीना
  16. 3ते 4 हिरव्या मिरच्या
  17. 3tsp भुजिया
  18. 2tsp लिंबु रस
  19. 1/2 कपदही
  20. 1/2काळे मिठ
  21. साधे मिठ (गरजेनुसार)
  22. पाणी गरजेनुसार

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    लाल चटणी - प्रथम एका पॅन मध्ये बडीशेप, जिरे आणि काळी मिरी घेऊन काही सेकंद भाजावे ते भाजुन झाल्यावर गॅस बंद करून त्यात कसुरी मेथी घालावी, कसुरी मेथी भांड्याच्या गरमीवरच भाजली जाईल. नंतर हे सर्व मसाले गार झाले की खलबत्त्यात कुटून (थोडे सरासरीत)बाजुला काढून ठेवावे.

  2. 2

    आता पॅन गॅसवर गरम करत ठेवून त्यात तुप घालावे आणि तुप पातळ झाले की त्यात तिखट घालून फेटावे आणि दिड कप पाणी घालावे आता या पाण्यात 1 कप साखर घालून ढवळत राहावे, साखर विरघळली की यात चिंचेचा कोळ घालून परत ढवळावे. नंतर यात काळे मिठ आणि आपण तयार करून बाजुला ठेवलेली पुड घालावी. आता हे मिश्रण थोडे दाट झाले की गॅस बंद करून तयार चटणी Serving bowl मध्ये काढावी.

  3. 3

    हिरवी चटणी- एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, मिरची, चवीनुसार साधे मिठ, काळे मिठ, लिंबु रस, भुजिया आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्सरवर त्याची एकदम smooth पेस्ट करून घ्यावी. नंतर या पेस्ट मध्ये दही घालून मिक्सरवर फिरवावे आणि तयार चटणी serving bowl मध्ये काढावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Kale Ranade
Pooja Kale Ranade @Pet_Po0ja
रोजी
cooking हा माझा एक आवडता छंद आहे, वेगवेगळ्या रेसिपी try करायला मला खूपच आवडते माझे स्वयंपाकघर ही माझी प्रयोगशाळा आहे म्हणायला हरकत नाही. फक्त मी हाडाची vegetarian असल्याने veg रेसिपीच try करते. वेगवेगळ्या रेसिपी साठी लागणारी वेगवेगळी भांडी आणि त्या सर्व्ह करण्यासाठी आकर्षक अशी भांडी खरेदी करायला ही मला खुप आवडते
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes