रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनिट
  1. 1 लिटरम्हशीचे दूध
  2. 1/3मेजरींग कप साखर
  3. 1/4 कपमिल्क पावडर
  4. 1 टेबल स्पूनथंडाई प्रिमीक्स
  5. 1/2टिस्पून वेलची जायफळ पूड

कुकिंग सूचना

४० मिनिट
  1. 1

    प्रथम एक लिटर दुधातील एक कप दूध काढून घेऊन बाकीचे गॅसवर उकळत ठेवले. दूध उकळायचे पातेले हे जड बुडाचे असावे नाहीतर खाली तवा ठेवावा म्हणजे दूध खाली करपणार नाही. व गॅस लो टू मिडीयम असावा.

  2. 2

    आता गॅसवर दुसऱ्या साईडला पॅनमध्ये साखर घेऊन ती मंद गॅसवर वितळू द्यावी ती वितळायला लागल्यावर मगच हलवावे. व साखर पूर्ण वितळून तिला ब्राऊनिश रंग आल्यावर गॅस बंद करावा हे आपले कॅरमल तयार झाले.

  3. 3

    आता ते कॅरॅमल लगेचच उकळत्या दुधात हळूहळू घालत मिक्स करावे दूध सतत हलवत राहावे कॅरमल घातल्यावर दूध फेसाळून वर येते म्हणून थोडे थोडे घालून हलवत राहावे. त्यात केशर काड्या व थंडाई मसाला ही घालावा.

  4. 4

    कॅरमलने दुधाला छान कलर येतो. आता काढून ठेवलेल्या एक कप दुधात मिल्क पावडर मिक्स करून ती वरील मिश्रणात घालावी व दूध आटेपर्यंत सतत हलवत राहावे मिश्रण घट्टसर झाल्यावर गॅस बंद करून त्यात वेलची जायफळ पूड घालावी.

  5. 5

    आता तयार मिश्रण थंड झाल्यावर कुल्फी मोल्ड व लहानशा मडक्यात घालून ते फ्रीजर मध्ये सेट करण्यासाठी ठेवावे. नंतर कुल्फी मोल्ड पाण्याखाली थोडासा धरून कुल्फी डिमोल्ड करून सर्व्ह करावी.

  6. 6

    थंडाई मसाल्याची रेसिपी मी आधीच पोस्ट केलेली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes