कढी पकोडा

उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणात हलक जेवायचे असेल तर भाताबरोबर कढी पकोडा एक छान पर्याय आहे.
कढी पकोडा
उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणात हलक जेवायचे असेल तर भाताबरोबर कढी पकोडा एक छान पर्याय आहे.
कुकिंग सूचना
- 1
आधी पकोडे तयार करावेत. त्यासाठी कांदा, कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावे. त्यात लाल तिखट हळद मीठ घालून मिक्स करून घ्यावे. गॅसवर तेल मध्यम आचेवर गरम करून त्यातील एक टेबल स्पून गरम तेल कांदा आणि बेसनाच्या मिक्स मध्ये घालून थोडे पाणी घालून पकोड्याचे मिश्रण तयार करावेआणि गरम तेलात तळून पकोडे तयार करून ठेवावेत.
- 2
मिरची आणि आले बारीक करून घ्यावे.ताकात बेसन, मीठ घालून मिक्स करून घ्यावे
- 3
गॅसवर पॅन मध्ये तूप घालून तापल्यावर त्यात जिरें,मिर्ची, आले हिंग घालून त्यात बेसन मिक्स केलेलं ताक घालावे. सारखे ढवळत रहावे. उकळी आली की साखर टाकून त्यात तळून ठेवलेले पकोडे सोडावेत. एक ते दोन मिनिटे उकळून घ्यावे वरून कोथिंबीर घालावी.
- 4
कढी पकोडा तयार.गरमागरम भाता बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कढी पकोडा (Kadhi Pakoda Recipe In Marathi)
#BPRकढी पकोडा रात्रीच्या जेवणासाठी कढी पकोडा राहिला म्हणजे खूप छान जेवण होते.साध्या कढी पेक्षा कढी पकोडा खाण्याची मजा काही औरच आहे आम्ही कढी पकोडा हे जेवण बाहेर फिरतांना प्रवासामध्ये बऱ्याचदा घेतले आहे. माझ्या मुलीलाही कढी पकोडा जास्त आवडतो त्यातले पकोडे निवडून खायला तिला मजा येते. मोठ्यांनाही कढी मधले पकोडे खाण्याची मजा येते. भातात मस्त कुस्करून पकोडा खाल्ला जातो.आता बघूया रेसिपी कढी पकोडा रेसिपी. Chetana Bhojak -
आलू वाली पकोडा कढी चावल (aloo wali pakoda kadhi chawal recipe in marathi)
#crपकोडा कढी चावल खायला ही चवदार आणि टेस्टी अशी वन मील डिश आहे रात्रीचा जेवनात तर खूप चांगली असते आम्हाला ही कढी उत्तराखंड यात्रा करताना आमच्या खाण्यात जास्त आलेली आहे बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पकोडा कढी आम्ही ट्राय केलेल्या आहे त्यातलाच हा एक आलू पकोडा कढी की आम्ही टेहरी या ठिकाणी खाल्ला होता आणि खायला खूप चविष्ट होता मी रेसिपी ही विचारून घेतली होती आता बऱ्याचदा अशा प्रकारची पकोडा कढी तयार करते भारतातील सर्वात जास्त उत्तर भागात हा कढीचा पदार्थ खाल्ला जातो तसा तर कढी भात पूर्ण भारतात खाल्ला जातो पण सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या आहे बनवायच्याही आणि खायच्या ही त्यातला हा एक खूप चविष्ट असा प्रकार आहे पकोडा करताना बटाट्याचा वापर केला आहे ज्याने पकोडा कढी अजून भरीव आणि पोट भरेल अशी तयार होते आलू मुळे पकोडे गुळगुळीत होत नाही. पण हे पकोडे करतानाच जास्त तर उचलून उचलून खाल्ले जातात चुपचाप आणि सांभाळून तयार करावी लागते😂 जेणेकरून पकोडा संपला तर कढीची मजाच जाईल त्यामुळे लक्ष द्यावे लागते.तर रेसिपी तुं बघूया आलू पकोडा कढी Chetana Bhojak -
"तडकेवाली कढी-पकोडा"(Tadkewali Kadhi Pakoda Recipe In Marathi)
#TR "तडकेवाली कढी-पकोडा " कधी तरी काही रेस्टॉरंट स्टाईल खायची इच्छा होत असेल, पण बाहेर जायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी आपल्या किचन मध्ये करणे मस्ट आहे बरं का....!! Shital Siddhesh Raut -
कढी पकोडा
#लोकडोवनरेसिपी 11 day या दिवसात बाहेर जाऊन भाजी घेण्यापेक्षा घरात असणाऱ्या वस्तू वापरून पदार्थ बनवायचा प्रयत्न चालू आहे म्हणून आज बनवलं कढी पकोडा Sushma Shendarkar -
शेवग्याच्या शेंगांची कढी
#फोटोग्राफी#कढीताकाची कढी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. कढी भात, कढी खिचडी हे प्रकार सगळीकडे आवडीने खाल्ले जातात. मी शेवग्याच्या शेंगा घालून कढी करते. फक्त शिजवलेल्या शेंगा नाही तर थोड्या शेंगांचा गर काढून कढीत घालते. त्यामुळे कढीला शेंगांचा छान स्वाद येतो. हे माझं स्वतःचं इनोव्हेशन आहे. Sudha Kunkalienkar -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR#कढीगोळेकढ़ी हा आमच्याकडे सर्वात लोकप्रिय असा खाद्यपदार्थ आहे रात्रीच्या जेवणात जास्त करून आमच्याकडे घेतला जातो. लहानपणापासूनच कढ़ी हा माझा आवडता पदार्थ आहे जसजशी मोठी होत गेली तसतसे बऱ्याच प्रकारची कढ़ी खाण्यात आली ताकाची कढी, दह्याची कढी, आमसुलाची कढी, चिंचेची कढी, कढ़ी पकोडा बऱ्याच प्रकारची कढ़ी टेस्ट केलेली आणि बनवली आहे माझेसासर विदर्भाचे असल्यामुळे कढ़ी गोळा हाही प्रकार बऱ्याचदा खाण्यात आलेला आहे घरातही बनवला जातो.पण आता बर्याच दिवसांनी हा पदार्थ तयार केला खूप आनंदही होत होता त्यात कढ़ी भात असा छान बेत जेवणात असणार आहे. मग तयारी करून फटाफट कढ़ी भात रात्रीच्या जेवणात बनवायला घेतला त्यात गावरान रेसिपी तही रेसिपी टाकायची होती .कढ़ी गोळा बनवताना शक्यतो आंबट दही घेतले तर कढ़ी अजुन छान होते . गोळे थोडे तिखट बनवले तर अजून भारी लागते कढ़ी भात ,पोळी भाकरी बरोबर छान लागते. तर बघूया कढी गोळा रेसिपी Chetana Bhojak -
खान्देशी फुनके कढी (phunke kadhi recipe in marathi)
#ks4 खान्देश फुनके कढी हा पदार्थ खान्देशातील जळगावचा फेमस आहे. ही रेसिपी थोडी वेगळी आणि टेस्टी आहे. मी माझ्या भाचीकडे जळगावला तिच्या घराच्या वास्तूशांती साठी गेले होते तेव्हा तिथे फुनके कढी खाल्ली हॊती. तर पाहू कशी बनवतात. Shama Mangale -
रुचकर कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी ...#रोज रोज आमटी वरण खाऊन कंटाळा आला की हमखास कढीचे वेध लागतात आम्हांला....कढी म्हणजे पंचपक्वानच जणू..कढी इतका मधुर,रुचकर पर्याय इतर कशाला असूच शकत नाही...एवढं आमचं कढी प्रेम...मग कधी कढी भात,कधी कढी खिचडी,तर काही वेळेस चक्क कढी पोळी हा बेत असतो..तसं पहायला गेलं तर कढी ही खाण्यापेक्षा पिण्यात जी मजा असते ती औरच असते..वाट्याच्या वाट्या कढी स्वाहा केली जाते.. कढी हा खाद्य प्रकार अखिल भारत वर्षात फारच लोकप्रिय..म्हणूनच वेगवेगळ्या प्रांतात कढीचे वेगवेगळे प्रकार केले जातात.. महाराष्ट्रातील कढी,कोकणीकढी,सोलकढी,गुजराती कढी,राजस्थानी कढी,पंजाबी कढी...अनेक प्रकार .. एवढे चवदार ताक,ताकाची कढी ..त्यावरुन आपल्या मराठीत तेवढ्याच interesting म्हणी आहेत ..म्हणजे बघा हं..बोलाचीच कढी बोलाचाच भात..शिळ्या कढीला ऊत आणणे..शेजीबाईची कढी न् धावू धावू वाढी..जिचे घरी ताक तिचे वरती नाक..ताक नाशी भाजी घर नाशी शेजारी..गाडगे धुवून कढी करी..ताक ते ताक दूध ते दूध..प्रीतीचो मोगो कढीयेच्या निमतान माज्याकडे ये गो.. तसचं तान्हा मुलांशी खेळताना त्यांच्या हाताची इवली इवली बोटे दूमडून आपण वरण,भात,भाजी,पोळी,कढी ...कढीची पाळ फुटली ती कोपर गावाहून बगल गावाला गेली गेली ..असं म्हणून गुदगुल्या करतो...मग तान्हुल्यांच निरागस खिदळणं ऐकण्यासारखं स्वर्गसुख नाही..बरोबर ना.. आहे की नाही गंमत.. खाद्यसंस्कृती ही लोक संस्कृतीत,लोक साहित्यात कशी बेमालूमपणे मिसळून गेलीये..आता शिळ्या कढीला जास्त ऊत न आणता आपण करुया रुचकर कढी...😀 Bhagyashree Lele -
खान्देशी फुनके आणि लसुणी कढी (khandesi fhunke ani lasuni kadhi recipe in marathi)
#KS4खान्देशी फुनके आणि सोबत लसुणी कढी मस्त भन्नाट combination आहे,खुप छान चविष्ट होतात.करुन बघा तुम्ही पण....... Supriya Thengadi -
गोळाभात कढी (gola bhat kadhi recipe in marathi)
#cr#गोळाभातकढी#काॅम्बोकाॅन्टेस्टगोळा भात ही विदर्भाची खासीयत...पारंपारिक पदार्थाची रेसिपी खास विदर्भीय शैलीत..गोळाभात आणि कढी हे समीकरणच आनंद देऊन जाणारे आहे.. तेव्हा नक्की ट्राय करा विदर्भीय स्पेशल *गोळाभात कढी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
पंजाबी कढी पकोडा (punjabi kadhi pakoda recipe in marathi)
#GA4#week1 कढी ची खमंग फोडणी दिली की घरभर कसा सुगंध दरवळतो.आणि या वासाने घरच्यांची भूक अजूनच चाळवते.आपल्या घरी कढी अगदि भूरकुन भूरकुन पिणारेही काही दर्दी असतातच अशासाठी मी खास आज सांगते आहे पंजाबी कढी पकोडा रेसिपी....हि रेसिपी मी GA4 या puzzle मधून पंजाबी आणि yoghurt म्हणजेच दही हे दोन key words घेऊन केली आहे..चला तर मग बघुया रेसिपी पंजाबी कढी पकोडा ची.... Supriya Thengadi -
ताकाची कढी (Takachi Kadhi Recipe In Marathi)
गरम गरम भाताबरोबर आंबट- गोड चवीची ताकाची कढी म्हणजे जेवणाची लज्जत न्यारीच !!!ताकाची कढी घरातील सर्व व्यक्तींना आवडते आणि अधून मधून नेहमी केली जाते जेवणाची चव वाढवणारी अशी ही ताकाची कढी. Anushri Pai -
पुरणपोळी कढी (Puranpoli kadhi recipe in marathi)
#Hsr#पुरणपोळी#कढीहोळी उत्सव निमित्त तयार केलेली पुरणपोळी आणि बरोबर कढी चे कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त लागतेपुरन पोळी बरोबर कढीचे कॉम्बिनेशन छान लागते गुजराती कम्युनिटी मध्ये सर्वात जास्त पुरण पोळी बरोबर कढी केली जाते. खायला चविष्ट लागते हे कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करून बघारेसिपी तून नक्कीच बघा पुरणपोळी आणि कढी Chetana Bhojak -
ताज्या ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीरोज रोज वरण भात व आमटी भात खाऊन कंटाळा येतो जेवणात गरम भाताबरोबर कढी ची वारायटी भूर्कायला मस्त मजा येते. Shubhangi Ghalsasi -
गुजराती कढी
#फोटोग्राफीआमच्या कडे कढी म्हंटल की मा ती सादी कढी असली तर म पकडा कढी च लागते आणि जर कढी खिचडी म्हंटल तर म गुजराती कढी चा दुसरा काही पर्याय नाही ए। ही कढी स्वादा ने गॉड-आंबट आणि खिचडी सोबत उत्तम पर्याय आहे। Sarita Harpale -
पंजाबी स्टाईल कढी पकोडा(kadhi pakoda recipe in marathi)
#उत्तर#पंजाब- आज मी इथे पंजाबी स्टाईल कढी पकोडा बनवला आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कढी पकोडा बनवतात. हे चवीला खुप छान लागतात. Deepali Surve -
-
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR कढी गोळे ही चवदार विदर्भाची खास पाककृती आहे. कढी गोळे हे आंबट दही किंवा ताक आणि हरभरा पिठाचे किंवा चना डाळ , तुरदाळ पकोडा आणि काही मसाले घालून ही पाककृती बनवली जाते. कढी गोळे हे भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खूप छान लागते. कढीगोळे ही रेसिपी महाराष्ट्रातील मराठवाडा तसेच विदर्भ भागातील पारंपारिक रेसिपी आहे. घरच्या साहित्यात, पुरेशा साहित्यात, सहज व सोपी पाककृती, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी चविष्ट लागते आणि कमी वेळात तयार होते. कधी भाजीला काही नसेल तर सहज आणि सोप्या पद्धतीने कढी गोळे बनविता येईल. विदर्भामध्ये ही रेसिपी विशेष आहे आणि खेडेगावात विशेष करून ही रेसिपी बनविली जाते. कढी गोळे असेल तर आणखी कुठल्याही भाजीची आवश्यकता नसते. Archana Gajbhiye -
पालक कढी पकोडा आणि भात (palak kadhi pakoda ani bhaat recipe in marathi)
#cr#कॉम्बो_कॉन्टेस्ट#पालक_कढी_पकोडा_आणि_भातकढी का सफरकढी हा प्रकार सर्व ऋतूत आवडीने खाल्ला जातो उन्हाळ्यात थंड कढी खाऊन मन तृप्त होते. भाज्या महाग, जड जेवणाने सारखी तहान लागते म्हणून कढी खिचडी भात इत्यादी बरोबर आवडीने खाल्ली जाते. थंडीत व पावसाळ्यात गरमागरम आले घातलेली लवंग जीरे ची फोडणी दिलेली झाले अंगात ऊब आणते जिभेला चव देते पूर्वी जसे लाडू जिलेबी भरपूर खाणारे खवय्ये होते तसेच सात आठ वाट्या कढी पिणारे ही होते. हॉटेल मध्ये गुजराती राजस्थानी थाळी मध्ये कढी आवर्जून असते त्याचा स्वाद वेगळाच असतो तर ढाब्यावरील कढीचा जायका निराळा असतो गोड मेजवानीचे जेवण झाले की रात्री हमखास कढी भाताचा बेत असतो तेवढी जागा प्रत्येकाच्या पोटात असते प्रत्येक गृहिणीची प्रत्येक घरातून कढी करण्याची पद्धत वेगळी त्यामुळे चव निराळी तसेच प्रत्येक प्रांताची खासियत वेगळी. कढी ही सर्व प्रिय असण्याचे कारण सहज उपलब्ध असणाऱ्या दही ताकापासून ती बनवली जाते शिवाय पटकन होते तर असा हा कढी महिमा निरनिराळ्या चवीच्या कढी बनवण्याच्या पद्धती मसाले वापरण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत त्यातील हा एक प्रकार पालक कढी पकोडा सोबत भात तुम्हालाही नक्की आवडणार चला तर मग बघुया👍 Vandana Shelar -
-
गुजराथी कढी
वेगवेगळ्या प्रकारच्या कढी आपण बनवतो.वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतींनी कढी बनते.गुजराथी कढी आंबट,गोड ,थोडी तिखट अशा चवीची असून मस्त लागते.खिचडी,मसालेभात सोबत खूपच छान.... Preeti V. Salvi -
रसाज की कढी (rasaj ki kadhi)
#फोटोग्राफीनेहमीची कढी खाऊन कंटाळा आला असेल तर ही कढी करून बघा. भातासोबत तर खूप छान लागते. चला तर मग बघुया रेसिपी... 😍😍😋😋 Ashwini Jadhav -
ताकाची मसाला कढी (takachi masala kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफीताकाची पारंपरिक कढी आपल्या सर्वांना माहीत आहेच.आजची ही ताकाची मसाला कढी तुम्हाला एका नव्या चवीची ओळख नक्कीच देईल. माझ्या मामीची रेसिपी आहे... नक्की करून पहा.Pradnya Purandare
-
कढी पकोडे
# lockdownrecipeमी नेहमी बेसनाचे पकोडे घालून कढी पकोडे करते. पण आज मी मिक्स डाळींचे पकोडे घालून केली आहे कढी पकोडे ही रेसिपी. आम्हाला सगळ्यांना खूप आवडली तुम्ही ही करून पाहा तुम्हालाही आवडेल. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
ताकाची कढी (taakachi kadhi recipe in marathi)
#GA4#week7#खरे तर मी नेहमी कढी करताना दह्याचा वापर करते. परंतु आज मात्र दह्या ऐवजी ताकाचा वापर करून कढी बनवलेली आहे ...वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारची कढी बनविल्या जाते.. परंतु मी करीत असलेली कढी ची कृती आज तुमच्यासमोर ठेवते... Varsha Ingole Bele -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week3#पकोडा कीवर्डब्रेड पकोडा हा स्ट्रीट फूड चा एक लोकप्रिय प्रकार आहे. पण तो चवीला खूप चांगला हवा तर त्याची लज्जत वाढते.मी खूप ठिकाणी ब्रेड पकोडा वेगवेगळ्या प्रकारचे खाऊन बघितले आहेत.त्यातलाच एक प्रकार Sampada Shrungarpure -
-
खान्देशी कढी (khandeshi kadhi recipe in marathi)
#KS4 #खान्देश_रेसिपीज #खान्देशी कढी... कढी हा साधारणपणे भारतात सगळ्या राज्यांमध्ये हे होणारा एक आवडीचा पदार्थ.... खूप सारे व्हेरिएशन्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.कढी म्हणजे किती प्रकार होतात ना आपली नेहेमीची आले-लसूण-मिरची वाटून लावलेली कधीतरी खोबरे घातलेली. पंजाबी कढी म्हणजे मस्तपैकी पकोडे तळून घातलेली. गुजराती कढी म्हणजे थोडी गोडसर आणि लसूण वगैरे न घालता दालचिनी, लवंगा घालून केलेली. तामिळनाडूमधे केलेली कढी म्हणजे तूरडाळ-तांदूळ-धने वाटून लावून केलेली. कर्नाटकातली कढी साधारण महाराष्ट्रातल्या सारखीच पण कधी पडवळ तर कधी भेंडी घालून केलेली!..यात आता अजून एक कढीचा प्रकार म्हणजे खानदेशी कढी. आता खानदेश आहे महाराष्ट्रात.. पण त्यांची कढी करायची पद्धत आहे थोडीशी वेगळी. लसूण-मिरची-आले एकत्र करून तो गोळा घट्ट तुपात मिसळतात. हा तूप-मसाल्याचा गोळा तयार होता तो, थोडे दगडफूल आणि कढीपत्ता असे सगळे एका वाटीत घेतात. लहान कोळश्याचा तुकडा लाल होईपर्यंत फुलवतात. आणि लाल फुललेल्या कोळश्याच्या निखाऱ्यावर तूप-मसाल्याचे मिश्रण घालून त्याची फोडणी करतात. आणि हे सगळे केले जाते मातीच्या मडक्यात!!! कोळसा, मडके, दगडफूल या सगळ्याची एकत्र चव जी काय लागते ती एकदम कमाल असते.पण आपण ही कढी गँसवरच आणि पातेल्यात करु या.. Bhagyashree Lele -
ताक कढी
#फोटोग्राफी गोव्या मध्ये अशी ताकाची खोबर घालून कढी बनवतात. आई च्या हातची ही कढी आणि भात असेल तर मग फक्त पापड लोणची सुद्धा पुरेस आहे.. Swayampak by Tanaya -
मेंदू वडा सांबर चटणी (medu vada sambar recipe in marathi)
#EB6#W6माझ्या घरी सर्वात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे मेंदू वडा सांबर चटणी सुट्टीच्या दिवशी तर नक्की साउथ इंडियन डिश चा बेत असतोचपटकन पोट भरणारा हा पदार्थ कोणत्याही वेळेस खाल्ला जातो नाश्त्यात, दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातोरेसिपी तून नक्कीच बघा वडा सांबर चटणी Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या