मासवडी रस्सा (Maswadi rassa recipe in marathi)

Sakshi Nillawar
Sakshi Nillawar @nillawarart9

एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन डिश जो मुख्यतः बेसन किंवा बेसन, मसाला, कांदा, नारळ, धणे आणि लसूण यांचा वापर करून मुख्यतः पुणे, मराठवाडा प्रदेशात तयार केला जातो. नारळ-कांदा-लसूण पेस्ट, कोल्हापुरी करी मसाला किंवा गोडा मसाला किंवा गरम मसाला आणि काही मसाल्यांचा वापर करून तयार केलेल्या करी किंवा ग्रेव्हीसोबत मासवडी नेहमी दिली जाते. हे गरम सर्व्ह केले जाते आणि भाकरी किंवा चपाती बरोबर चांगले जाते.

मासवडी रस्सा (Maswadi rassa recipe in marathi)

एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन डिश जो मुख्यतः बेसन किंवा बेसन, मसाला, कांदा, नारळ, धणे आणि लसूण यांचा वापर करून मुख्यतः पुणे, मराठवाडा प्रदेशात तयार केला जातो. नारळ-कांदा-लसूण पेस्ट, कोल्हापुरी करी मसाला किंवा गोडा मसाला किंवा गरम मसाला आणि काही मसाल्यांचा वापर करून तयार केलेल्या करी किंवा ग्रेव्हीसोबत मासवडी नेहमी दिली जाते. हे गरम सर्व्ह केले जाते आणि भाकरी किंवा चपाती बरोबर चांगले जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 servings
  1. सारण
  2. 1वाटी किसून भाजून घेतलेले सुके खोबरे
  3. 1/2वाटी भाजून घेतलेले तीळ
  4. 1चमचा भाजलेली खसखस
  5. तळुन घेतलेला कांदा 1(मध्यम)
  6. 10-12लसुण पाकळ्या
  7. चवीप्रमाणे मीठ
  8. आवरण
  9. 1/4चमचाहींग
  10. 1/2चमचा हळद
  11. 1टेबलस्पून हिरवी मिर्च आणि लहसुन यांचा ठेचा /लाल तिखट
  12. 2वाटी चाळुन घेतलेले बेसन पीठ
  13. 2 1/4वाटी पानी
  14. मीठ
  15. तेल
  16. मासवडी रस्सा
  17. 4चमचे घरगुती लाल तिखट
  18. 1टीस्पून जीरे
  19. 1/2वाटी भाजून घेतलेले खोबऱ्याचे काप
  20. 1/2वाटी भाजलेला कांदा
  21. 4-5लसूण पाकळ्या
  22. कोथिंबीर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सारण बनवण्यासाठी तीळ, सुकं खोबरं आणि खसखस कोरडीच, निरनिराळी भाजून घ्यावी. गार झाले कि मिक्सरमध्ये सरसरीत दळून घ्यावे..

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यातहींग हळद घालावे. कांदा आणि बारीक चिरलेली लसूण घालून परतावे. कांदा चांगला परतला गेला कि बाजूला काढून ठेवावा आणि गार झाला कि मिक्सरमध्ये वाटावा. वाटताना घरगुती लाल तिखट आणि मीठही घालावे. वाटलेले कांद्याचे मिश्रण आणि तीळ सुकं खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करावे. चव पाहून लागेल ते जिन्नस घालावे.

  3. 3

    सारण तयार झाले कि आवरण बनवायला घ्यावे. कढईमध्ये तेल गरम करून त्यातहींग, हळद, जीरे, लसूण आणि हिरवी मिर्च पेस्ट घालून परतून घ्यावे. एका मोठ्या बाउल मध्ये पानी घालावे. पाण्यात मीठ घालावे. त्यात बेसन घालून पाण्यात बेसन पीठ नीट मिक्स करून घ्यावे. गुठळ्या होवू देउ नयेत. फोडणीमध्ये बेसन पीठ आणि पानी मिक्स केलेले मिश्रण टाकावे ‌ मध्यम आचेवर २-३ वाफा काढाव्यात. पीठ शिजले पाहिजे. वाटल्यास थोडे खावून पहावे. कच्चट लागत असेल तर अजून थोडावेळ शिजू द्यावे किंवा पीठ हाताला चिकटत नाही हे बघावे ्

  4. 4

    पीठ शिजले कि कोमट होवू द्यावे. नंतर हातानेच कॉटनच्या कपड्यांवरं मध्यमसर थापावे. यावर तयार सारणाचा पातळ थर द्यावा आणि घट्ट सुरळी करावी. शेवटचे टोक नीट चिकटवावे. वड्या पाडाव्यात.

  5. 5

    कढईमध्ये तेल तापवावे त्यात मोहरी, जीरे आणिहींग घालावे आणि घरगुती मसाला घाला आणि मिनिटभर परतवा. कांदा लसुण खोबरे वाटण आणि उरलेले सारण घालून मिक्स करावे. तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे. रस्सा बनवण्यासाठी पानी घाला. पानी घातल्यावर मोठ्या आचेवर रस्सा उकळून घ्या. त्यानंतर कढईला लागलेली खरवड,मीठ व कोथिंबीर घालून चांगले मंद गॅसवर पाच मिनिटे उकळून घेणे. मासवडी रस्सा तयार आहे.
    वड्यांवर रस्सा टाकून बाजरीची भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर त्याचा आनंद घ्या.

  6. 6

    हा पदार्थ शिजवायला थोडे अवघड आहे पण चवीला अप्रतिम आहे. आणि जर चव चांगली असेल तर सर्वकाही योग्य आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sakshi Nillawar
Sakshi Nillawar @nillawarart9
रोजी
Hii friendsMy name is sakshi ...I am From Maharashtra india ...I am vegetarian 👩‍🍳👩‍🍳I love kitchen cooking ... ❣️❣️Nice to meet u all my dear foodie .. I just fellow everyone in this Cookpad and Instagram !!
पुढे वाचा

Similar Recipes