सीताफळची बासुंदी (sitafal basundi recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

हिवाळा ऋतू म्हटला की आपल्याला गोड गर असणारे सीताफळ आठवते. सध्या बाजारात छान-छान सीताफळ आली आहे आणि पिकलेले सीताफळ खाण्याची मजा काही औरच असते. तरी या सीझनल फ्रुट पासून बनविलेली एक डेझर्ट ची रेसिपी मी शेअर करते आहे.

सीताफळची बासुंदी (sitafal basundi recipe in marathi)

हिवाळा ऋतू म्हटला की आपल्याला गोड गर असणारे सीताफळ आठवते. सध्या बाजारात छान-छान सीताफळ आली आहे आणि पिकलेले सीताफळ खाण्याची मजा काही औरच असते. तरी या सीझनल फ्रुट पासून बनविलेली एक डेझर्ट ची रेसिपी मी शेअर करते आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 लिटरदूध
  2. 1/4 कपसाखर
  3. 1 कपसीताफळचा गर
  4. 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर
  5. 4-5थोडया केशरच्या काड्या
  6. 2 टेबलस्पून ड्रायफ्रुटस (बदाम, पिस्त्याचे काप)

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सीताफळातील बिया वेगळे काढून गर बाजूला काढून घ्यावा.

  2. 2

    हा गर मिक्सरमधून थोडासा ग्राईंड करून तयार पेस्ट एक वाटीत काढून घ्यावा.

  3. 3

    गॅसवर दूध गरम करून साधारणतः 20 ते 25 मिनिटे पर्यंत आटवून घ्यावे. दूध अटविताना ते अधूनमधून चमच्याने हलवीत राहावे.

  4. 4

    एक वाटीत केशरच्या काड्या घेऊन त्यात थोडे दूध घालून मिक्स करून घ्यावे आणि आटवलेल्या दुधात ओतून मिक्स करून घ्यावे.

  5. 5

    आता एक वाटीत कस्टर्ड पावडर घेऊन त्यात थोडे थंड दूध घालून पातळ पेस्ट बनवून घ्यावी.

  6. 6

    ही पेस्ट आटवलेल्या दुधात मिक्स करून घ्यावी. शेवटी साखर घालून दूध परत एकदा मिक्स करून थंड करायला ठेवावे.

  7. 7

    दूध थोडे थंड झाल्यावर त्यात सीताफळाचा गर व्यवस्थित मिक्स करून घ्यावा आणि बासुंदी थंड करायला ठेवावी.

  8. 8

    बासुंदी थंड झाल्यावर बाऊलमध्ये काढून त्यावर ड्रायफ्रुटसने गार्निश करून सर्व्ह करावी. तयार आहे आपली सीताफळ बासुंदी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes