सीताफळ बासुंदी (sitafal basundi recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

दुधापासून खूप सारे पदार्थ करता येतात. दूध आटवून त्यात साखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकून बासुंदी केली जाते. लग्नसमारंभात तर तिला मानाचे स्थान....थंड-थंड बासुंदी प्यायची मजा काही औरच... सद्या सीताफळचा सीझन आहे म्हणूनच आज सीताफळ बासुंदी केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 जणांसाठी
  1. 1 लिटरदूध
  2. 1/3 कपसाखर
  3. 1 टीस्पूनवेलची पावडर
  4. 8-9केसर काड्या
  5. 1/2 कपड्रायफ्रूट
  6. 1 कपसीताफळचा गर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सगळयात आधी दूध तापत ठेवा. दुधाला उकळी आली 2 टेबलस्पून दूध एका कपात घेऊन त्यात केसर काड्या घालून भिजत ठेवायचं. आता बाकीचे दूध सतत ढवळत राहायचे जोपर्यंत ते अर्धा नाही होत. मग त्यात साखर टाका मी इथे साखरेचे प्रमाण कमी घेतलं आहे कारण आम्हाला जास्त गोड नाही आवडत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमीजास्त घेऊ शकता.

  2. 2

    आता त्यात भिजवलेले केशर चे दूध आणि ड्रायफ्रूट टाकून ढवळा. मग त्यात वेलची पावडर टाका. गॅस बंद करून बासुंदी थंड होऊ द्या.

  3. 3

    थंड झालेल्या बासुंदी मध्ये सीताफळ चा गर टाकून चांगले चमच्याने मिक्स करून घ्या आणि फ्रिजमध्ये थंड करत ठेवा. थंड झाली की आपली बासुंदी खाण्यासाठी तयार आहे. गरमगरम पुरी सोबत खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes