गुळ पापडी (बर्फी)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#GA4
#WEEK15
#कीवर्ड_गुळ

"गुळ पापडी"

या मिठाई ला गुळ पापडी हे नाव खरच साजेस आहे...कारण गुळाचा स्वाद आणि पापडी सारखी भुसभुशीत.. अप्रतिम चव..😋

गुळ पापडी (बर्फी)

#GA4
#WEEK15
#कीवर्ड_गुळ

"गुळ पापडी"

या मिठाई ला गुळ पापडी हे नाव खरच साजेस आहे...कारण गुळाचा स्वाद आणि पापडी सारखी भुसभुशीत.. अप्रतिम चव..😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
पाच जणांसाठी
  1. एक कप गव्हाचे पीठ
  2. पाऊण कप गुळ.. आवडीप्रमाणे कमी, जास्त घेऊ शकता
  3. अर्धा कप तुप
  4. अर्धा टीस्पून वेलचीपूड
  5. पाव टीस्पून जायफळ पूड
  6. ड्रायफ्रुट्स आवडीप्रमाणे..मी पिस्ता बारीक कापून घेतला आहे.
  7. एक टीस्पून खसखस

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    पीठ चाळून घ्या... गॅसवर पॅनमध्ये पीठ घालून पाच मिनिटे भाजून घ्या.. नंतर पाव कप तुप टाकून पाच मिनिटे पीठ भाजून घ्या... उरलेले तुप टाकून मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घ्यावे..सतत हलवत रहावे..

  2. 2

    गॅस बंद करून दोन मिनिटे पीठ हलवत रहावे.. कारण पॅन गरम असतो.पीठ करपण्याची शक्यता असते..

  3. 3

    एका ताटाला किंवा बर्फी ट्रे ला तुप लावुन घ्या..

  4. 4

    पीठ थंड नाही होऊ द्यायचे... लगेचच बारीक चिरलेला गुळ मिक्स करा..व तुप लावलेल्या ताटात मिश्रण घालून चमच्याने किंवा स्पॅच्युला ने एकसारखे पसरवून घ्यावे..व त्यावर आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालून हलक्या हाताने थोडे दाबून घ्यावे..

  5. 5

    लगेचच हव्या त्या आकारात काप करून घ्यावेत..

  6. 6

    अर्ध्या तासाने थंड झाल्यावर गुळ पापडी बर्फी खाण्यासाठी तयार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes