तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#मकर
चटणी ही कुठलीही असो.. एवढे मात्र खरे की जेवणाची लज्जत चटणी मुळे वाढते.... घराघरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पदार्थापासून चटणी बनवल्या जाते. त्यामधलाच एक प्रकार म्हणजे *तिळाची चटणी*..
तिळाची चटणी जेवणाची चव वाढवते तसेच खायला रुचकर आणि पौष्टिक देखील आहे. तिळाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. तसेच कॅल्शियम आणि झिंक देखील यामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याकडे आवर्जून तिळाचा समावेश आहारात केला जातो....
अशी ही बहुगुणी आणि आरोग्यवर्धक समजल्या जाणारी तिळाची चटणी.. 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 1/2 कपतिळ
  2. 1/4 कपखोबराकिस
  3. 3-4लाल सुक्या मिरच्या
  4. मीठ चवीनुसार
  5. 1/2 टेबलस्पूनसाखर
  6. 2-3लसूण पाकळ्या
  7. 1/2 टेबलस्पूनजीरे
  8. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  9. 1/2 टीस्पूनतिखट

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    तिळ, खोबरे मंद आचेवर चांगले भाजून घ्यावे. गॅस बंद करून त्याच पॅनमध्ये जीरे, लाल मिरच्या घालून भाजुन घ्यावे.

  2. 2

    तिळ, खोबरे थंड झाल्यावर मिक्सर मधून काढून घ्यावे. नंतर त्यामध्ये तिखट, (तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करु शकता) मीठ, लाल सुक्या मिरच्या, साखर, लसूण पाकळ्या, आमचूर पावडर घालून एकदाच फिरवून घ्यावे.

  3. 3

    तयार आहे आपली तिळाची चटणी.. 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes