भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी (bhogi chi bhaji ani bajrichi bhakhri recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी (bhogi chi bhaji ani bajrichi bhakhri recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबाजरीचे पीठ
  2. 1 टेबलस्पुनतीळ
  3. 1 कपओले मटार, शेंगदाणे आणि हरभरे
  4. 1 कपचिरलेली वांगी, बटाटा, गाजर,
  5. 1 कपमोड आलेले मूग व मटकी
  6. 1 कपमेथीची व पालकाची पाने व पातीचा काांदा
  7. 7-8 तुकडेशेवग्याच्या शेंगा
  8. 1 टेबलस्पुनतिळकुट व शेंगदाण्याचा कूट
  9. 1 टेबलस्पुनकोल्हापुरी कांदा लसूण मसाला
  10. 1कच्चा व १ लाल टोमॅटो
  11. 1कांदा
  12. 1 टीस्पूनहळद
  13. 1 टीस्पूनमीठ
  14. 2 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  15. 1 कपओले खोबरे
  16. 1 कपकोथिंबीर

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    प्रथम सगळ्या भाज्या स्वच्छ धुऊन चिरून घ्याव्या. मोड आलेली मटकी, मटार, मुग शेंगदाणे व हरभरे द्यावे.कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, ओले खोबरे आले, लसूण व हिरव्या मिरच्या टाकून वाटण वाटून घ्यावी. एका पातेल्यात तेल घालून जीरे मोहरी घालावी. कांदा, टोमॅटो घालून चांगला परतून घ्यावा. चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये वाटलेला मसाला घालून चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    मसाला चांगला परतून झाला की त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, जीरे पावडर, धनी पावडर घालून चांगला मिक्स करावा नंतर त्यामध्ये कापलेल्या बटाटे गाजर फ्लॉवर हरभरे मूग मटकी शेंगदाणे या भाज्या घालून घालून चांगले परतून घ्यावे व पाणी घालून पाच मिनिटे चांगली शिजू द्यावे.

  4. 4

    नंतर त्यामध्ये चिरलेल्या पालेभाज्या पाच मिनिटे शिजू द्यावे भाज्या चांगल्या शिजल्या कि त्यामध्ये तिळकूट व शेंगदाण्याचा कूट घालून चांगले परतून घ्यावे. वरून तीळ घालावे

  5. 5

    परातीत बाजरीचे पीठ घेऊन त्यामध्ये गरम पाणी घालून चांगले मळून घ्यावे. नंतर त्या पिठाचे गोळे करून ठेवा. पराती मधे भाकरी थापून घ्यावी. तीळ वरून लावावे. गरम तव्यावर भाजून घ्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes