मसाला ताक (masala taak recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#trending
मसाला ताक माझं अतिशय आवडीचे पेय,माज्या घरी तर रोज हे बनवलं जातं बाराही महिने ,न घरचं ताजं दही लावून ताक बनवलं जातं त्यामुळे कधी बाधत नाही.
ताकामध्ये बी 12 , पोटँशियम व असे अनेक गुणधर्म असल्याने ताक आपल्या जीवनात एक अतिशय उत्तम प्रकारे काम करते,रोज ताक पिल्याने लघवीचे काही आजार असतील ते बरे होतात,तसेच ताक पिल्याने अशक्तपणा कमी होऊन शरीर बलवान होते,ताकात मिरपूड टाकून पिल्यास किंवा गुळण्या केलेस आलेले तोंड बरे होते,ताकात जायफळ टाकून पिलेस डोकेदुखी थांबते ,लहान बाळाला दात येताना रोज 4 चमचे ताक पाजा त्याला त्रास कमी होईल,ताक शरीरातील पाण्याची मात्रा संतुलीत ठेवते,एक न अनेक असे गुण असलेले बहुगुणी ताक प्रत्येकाच्या आहारात रोज असलंच पाहिजे ,मग ते ताक तुम्ही तसेच ताजे प्या किंवा मसाला ताक प्या तर मग बघूयात कसं करायचं मसाला ताक...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
4 लोकं
  1. 1 कपदही
  2. 1 चमचामीठ
  3. 1 चमचासाखर
  4. 1/2 चमचाकाळे मीठ
  5. 1/2 टीस्पूनजिरेपूड
  6. 1/4हिंग
  7. 1/4 टीस्पून मिरपूड
  8. 1हिरवी मिरची
  9. 6-7कडीपत्ता पानं
  10. तूप,जीरे ,मोहरी फोडणीसाठी
  11. 2 चमचेबुंदी
  12. 2 चमचेकोथिंबीर
  13. 1/2 इंचआलं
  14. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र घ्या,मग एक भांड्यात दही काढून पाणी घालून रवी ने घुसळून घ्या व ताक तयार करा,तुम्ही हे मिक्सर वर पण करू शकता

  2. 2

    एक छोट्या भांड्यात तूप घालून फोडणी करून हिंग,जीरे,मोहरी,मिरची, कडीपत्ता, कोथिंबीर घालून फोडणी करून घ्या व ताकात ओता, बाकी जिन्नस पण घाला मीठ,साखर, जिरेपूड, मिरेपूड, आलं मग सगळं एकत्र हलवून घ्या.

  3. 3

    झालं तयार आपलं मसाला ताक वर बुंदी घालून प्यायला द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या (5)

Similar Recipes