मुगडाळीची मसाला खिचडी (moongdalichi masala khichdi recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#kr खिचडी म्हणजे आपल्या भारतीयांचे वन पाॅट मिल आहे. हे अगदी खरं आहे. सर्वांना आवडणारी, झटपट होणारी, पौष्टिक, पोटभरीची अशी ही खिचडी.
मी नेहमी मुगडाळीची पिवळी खिचडी बनवते.*मी आज सुवर्णा पोतदार यांची मुगडाळीची मसाला खिचडी बनवली. कूकस्नॅप केली. खूप छान झालेली. सर्वांना आवडली.

मुगडाळीची मसाला खिचडी (moongdalichi masala khichdi recipe in marathi)

#kr खिचडी म्हणजे आपल्या भारतीयांचे वन पाॅट मिल आहे. हे अगदी खरं आहे. सर्वांना आवडणारी, झटपट होणारी, पौष्टिक, पोटभरीची अशी ही खिचडी.
मी नेहमी मुगडाळीची पिवळी खिचडी बनवते.*मी आज सुवर्णा पोतदार यांची मुगडाळीची मसाला खिचडी बनवली. कूकस्नॅप केली. खूप छान झालेली. सर्वांना आवडली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिटे
4ते6 जणांसाठी
  1. 1 कपतांदूळ
  2. 3/4 कपपिवळी मुगडाळ
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. थोडी कोथिंबीर
  6. 1 टेबलस्पूनलसूण-खोबरे पेस्ट
  7. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 1.5 टीस्पूनगोडा मसाला
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनधने पावडर
  11. 4-5काळीमिरी
  12. 1तमालपत्र
  13. 1 टीस्पूनजीरे
  14. 1 टीस्पूनमोहरी
  15. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  16. 1 टेबलस्पूनदही
  17. 1.5 टेबलस्पूनतेल
  18. चवीप्रमाणे मीठ
  19. गरजेप्रमाणे पाणी

कुकिंग सूचना

30-40 मिनिटे
  1. 1

    तांदूळ व डाळ स्वच्छ निवडून व पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेणे.

  2. 2

    कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. कोथिंबीर ही चिरून घेणे.

  3. 3

    कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की, त्यात जीरे-मोहरी, मीरे, तमालपत्र घालून चांगले परतवून घेणे. नंतर कांदा घालून गुलाबी सर भाजून घेणे. टोमॅटो घालून परतून घेणे. टोमॅटो चांगले परतवून घेणे.

  4. 4

    खोबरे - लसूण पेस्ट,सर्व मसाले घालून 3-4 मिनिटे परतणे. मीठ घालणे. तांदूळ घालून परतवून घेणे.

  5. 5

    नेहमी पेक्षा थोडे जास्त पाणी घालावे. उकळी येऊ देणे. उकळी आल्यावर दही घालून हलवून घेणे.

  6. 6

    नंतर साजूक तूप घालून हलवून घेणे. गॅस मंद आचेवर ठेवून खिचडी शिजू द्यावी. 20-25 मिनिटे लागतात. अधूनमधून हलवून घेणे. शेवटी एकदम कमी म्हणजे थोडेसेच पाणी राहिले की गॅस बंद करावा. झाकण ठेवून वाफेवर होऊ द्यावे.

  7. 7

    खायला घेताना वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे. सोबत कोणतेही लोणचे, पापड घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes