कलिंगडाच्या पांढऱ्या भागापासून उपवासाचे धोंडस (dhondas recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

तवसाचे धोंडस हा पारंपरिक पदार्थ आहे.त्यात तांदळाचा रवा वापरतो.मी थोडा ट्विस्ट देऊन वरीचे तांदुळ आणि कलिंगडाचा पांढरा भाग यांचा वापर केला.त्यामुळे ही डिश उपवास स्पेशल आहे.

कलिंगडाच्या पांढऱ्या भागापासून उपवासाचे धोंडस (dhondas recipe in marathi)

तवसाचे धोंडस हा पारंपरिक पदार्थ आहे.त्यात तांदळाचा रवा वापरतो.मी थोडा ट्विस्ट देऊन वरीचे तांदुळ आणि कलिंगडाचा पांढरा भाग यांचा वापर केला.त्यामुळे ही डिश उपवास स्पेशल आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५ ते ४० मिनीटे
६-७
  1. 1 कपकिसलेला कलिंगडाचा पांढरा भाग
  2. 1/2 कपवरीचे तांदूळ
  3. 1 कपगूळ....आवडीनुसार कमी जास्त
  4. 1/4 कपखोबऱ्याचा चव
  5. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  6. 7-8काजू
  7. 1/4 टीस्पूनवेलची पूड
  8. चिमूटभरमीठ
  9. 2 टेबलस्पूनतूप
  10. 2 कपपाणी... अंदाजे

कुकिंग सूचना

३५ ते ४० मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.वरीचे तांदूळ तुपावर परतून घेतले.,शेंगदाणे आणि काजू थोड्याशा तुपावर परतून घेतले.

  2. 2

    कलिंगडाचा पांढरा भाग किसून,त्यात गुळ घालून ते वरीच्या तांदुळासोबत परतून घेतले.पाणी घालून छान उकळले झाकण ठेऊन वाफवले,आटवून घेतले.

  3. 3

    त्यात शेंगदाणे,काजू,मीठ घालून नीट मिक्स केले.ज्या भांड्यात धोंडस बनवायचे आहे त्याला तुपाने ग्रीस करून घेतले.त्यात तयार मिश्रण पसरवून घेतले.

  4. 4

    एका मोठ्या पातेल्यात हे भांडे झाकण ठेऊन बेक करण्यासाठी ठेवले.पातेल्याच्या खाली तवा व वर झाकण ठेवले.मध्यम आचेवर ३५ मिनीटे बेक केले.सुरी घालून धोंडस शिजला की नाही ते पाहिले.मिश्रण सूरीला चिकटले नाही म्हणजे शिजला.

  5. 5

    पूर्णपणे गार झाल्यावर धोंडस ताटात उपडा करून घेतला.त्याचे चौकोनी काप करून घेतले आणि सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes