सावजी अंडा करी (savji anda curry recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

"सावजी अंडा करी"

श्रावण संपला
मुलांची लगेच नाॅनव्हेज खाण्याची घाई सुरू होते.. हल्ली मुलांमुळे करावे लागते.. नाहीतर आम्ही श्रावणात नाॅनव्हेज बंद केले की डायरेक्ट दिवाळी नंतर च बनवायचे असा आमचा नियम होता..कारण श्रावण संपला की गणपती ची तयारी सुरू व्हायची.. गणपती गेले की पितृ पक्ष मग घटस्थापना , नवरात्र उत्सव,मग दिवाळी ची तयारी असे असायचे..पण आता हे असं..करावच लागतं..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटे
दोन
  1. 2अंडी
  2. 2लवंग, एक टीस्पून खसखस
  3. 1/2 इंचदालचिनी तुकडा
  4. 3काळीमिरी
  5. 1/2चक्रीफुल
  6. 1तमालपत्र
  7. 1कांदा
  8. 1टाॅमेटो
  9. 1बारीक कांदा बारीक चिरून फोडणीसाठी
  10. 1/2 टीस्पूनआलं लसुण पेस्ट
  11. 1 टीस्पूनलाल तिखट
  12. 1 टीस्पूनकरी मसाला
  13. 1 टीस्पूनघरचा मसाला
  14. 1/4 टीस्पूनहळद
  15. आवडीनुसार कोथिंबीर
  16. चवीनुसारमीठ
  17. तेल

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    अंडी उकडून साल काढून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात अंडी लाल तिखट, हळद, मीठ घालून फ्राय करून घ्या.. प्लेट मध्ये काढून घ्या

  2. 2

    कढईत तेल घालून आले लसूण पेस्ट,कांदा टाॅमेटो, खडे मसाले सगळे घालून परतून घ्या..व कोथिंबीर घालून सगळे मसाले बारीक वाटून घ्या

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे,बारीक चिरलेला कांदा, सुके मसाले घालून चांगले परतून घ्या.वाटप केलेला मसाला घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे व नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून मध्यम आचेवर दहा मिनिटे शिजू द्यावे.मग अंडी घालून दहा मिनिटे शिजू द्या..बस तयार आहे सावजी अंडा करी..

  4. 4
  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes