इन्स्टंट गार्लिक ब्रेड (instant garlic bread recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, झटपट होणारा पदार्थ... इन्स्टंट गार्लिक ब्रेड

इन्स्टंट गार्लिक ब्रेड (instant garlic bread recipe in marathi)

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, झटपट होणारा पदार्थ... इन्स्टंट गार्लिक ब्रेड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 8सँडविच ब्रेड स्लाईसेस
  2. 3 टेबलस्पूनबटर
  3. 1/2 टेबलस्पूनलसूण किसून
  4. 1 टीस्पूनचीली फ्लेक्स
  5. 1 टेबलस्पूनमिक्स हर्ब्ज
  6. कोथिंबीर
  7. चीज

कुकिंग सूचना

10-15 मिनिट
  1. 1

    सर्व सामग्री एकत्र ठेवावी. एका बाउलमध्ये बटर घेवून, त्यात, लसूण, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्ज, कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    आता ब्रेड स्लाइस घेवून त्यावर चीज किसून टाकावे. दुसऱ्या ब्रेडला बटर चे तयार मिश्रण लावून घ्यावे.

  3. 3

    आता बटर लावलेली ब्रेड चीज लावलेल्या ब्रेडवर ठेवावी. अशा प्रकारे ब्रेड तयार करून घ्याव्यात. तोपर्यंत गॅसवर तवा गरम करावा. त्यावर तयार ब्रेड ठेवाव्यात. बटर लावलेली बाजू आधी तव्यावर ठेवावी. आता वरच्या बाजूला सुद्धा बटर लावून घ्यावे.

  4. 4

    म्हणजे ब्रेडचा दोन्ही बाजूला बटर चे मिश्रण लावून, छान खरपूस भाजून घ्याव्यात.

  5. 5

    आता तयार ब्रेड, कापून घ्याव्यात. आणि संध्याकाळच्या वेळी, गरमागरम, चहासोबत आस्वाद घेण्यासाठी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes