मटर पॅटिस (matar patties recipe in marathi)

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
डोंबिवली

#EB3
#W3
थंडीत मार्केटमध्ये हिरवा ताजा मटार हा खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.हिरव्या मटारमध्ये लोह, झिंक, मॅगनीज, कॉपर ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. ही सर्व तत्त्वे शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
मटार पॅटीस खूप कमी साहित्यात आणि झटपट तयार होतात. आणि चवीला सुंदर लागतात.

मटर पॅटिस (matar patties recipe in marathi)

#EB3
#W3
थंडीत मार्केटमध्ये हिरवा ताजा मटार हा खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.हिरव्या मटारमध्ये लोह, झिंक, मॅगनीज, कॉपर ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. ही सर्व तत्त्वे शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
मटार पॅटीस खूप कमी साहित्यात आणि झटपट तयार होतात. आणि चवीला सुंदर लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनटं
2 लोक
  1. 1 वाटीमोठी ताजी सोडलेले मटारचे दाणे
  2. 2उकडलेले बटाटे
  3. 1कांदा बारीक चिरलेला (ऑप्शनल)
  4. 5-6 लसणाच्या पाकळ्या
  5. 1/2 इंचआल्याचा तुकडा
  6. 3-4 हिरव्या मिरच्या
  7. 1 वाटीकोथिंबीर
  8. 1/4 चमचाधनेपूड
  9. 1/2 चमचाजीरे पूड
  10. 1/4 चमचाहळद
  11. 1/4 चमचालाल तिखट
  12. 1/4 चमचागरम मसाला
  13. 1/4 चमचाआमचूर पावडर
  14. 3-4चिमूट चाट मसाला
  15. मीठ चवीनुसार
  16. 5-6ब्रेडचा चुरा ब्रेडक्रम्स
  17. पॅटिस तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनटं
  1. 1

    सर्व प्रथम मटार स्वच्छ धुऊन ते तीन ते चार मिनिटे गरम पाण्यामध्ये उकळवून घ्या. मटार थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये मटार, चिरलेला कांदा, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्सरला वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या.वाटताना पाणी अजिबात घालू नका.

  2. 2

    तयार पेस्ट एका बोल मध्ये काढून त्यामध्ये उकडलेले बटाटे कुस्करून घाला. सर्व मसाले व मीठ घाला. सर्व मिश्रण चमच्याने चांगले मिक्स करून घ्या.आता त्यामध्ये थोडं थोडं करून ब्रेडक्रम्स ऍड करा. मिश्रणाचा हाताने गोळा बांधला जाईल तेवढे ब्रेडक्रम्स ॲड करा.

  3. 3

    हातावर मिश्रणाचा गोळा घेऊन त्याला पॅटीस चा आकार द्या. अशाच प्रकारे सर्व पॅटीस तयार करून घ्या.

  4. 4

    एका बोल मध्ये दोन तीन चमचे मैदा घेऊन त्यामध्ये पाणी ॲड करा. आणि घट्टसर पेस्ट तयार करून घ्या. तयार पॅटीस मैद्याच्या पेस्ट मध्ये घोळवून नंतर ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून घ्या. सर्व पॅटीस ला मैद्याची पेस्ट आणि ब्रेड क्रम्स सगळ्या बाजूंनी व्यवस्थित लावून घ्या.

  5. 5

    पॅनवर तेल गरम करून मध्यम आचेवर पॅटिस दोन्ही बाजूने छान कुरकुरीत आणि सोनेरी रंगावर फ्राय करून घ्या. गरमागरम मटार पॅटीस टोमॅटो केचप किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
रोजी
डोंबिवली
I am a food lover🍱🥘🍲🥗🍜,Youtuber🎥👩‍💻 and Home shef 👩‍🍳.I like to cook for those who have respect and love for food 😊🙏.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes