झटपट कोथींबीर वडी (Kothimbir vadi recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#ट्रेडिंग रेसिपी

झटपट कोथींबीर वडी (Kothimbir vadi recipe in marathi)

#ट्रेडिंग रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. 1/2जुडी कोथिंबीर (मोठी जुडी २ ते २+१/२ मेजरींग कप)
  2. 1मेजरींग कप बेसन
  3. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  4. 1 टेबलस्पूनतीळ
  5. १ १/२ टिस्पून तिखट
  6. 1/2 टिस्पून हळद
  7. 1 टिस्पून धणेपूड
  8. 3/4 टिस्पून जीरे पावडर
  9. 2लिंबाचा रस
  10. 1 टेबलस्पूनमोहन
  11. मीठ चवीनुसार
  12. 1/4टिस्पून बेकिंग सोडा

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम कोथिंबीर स्वच्छ धुऊन चिरून घेतली.

  2. 2

    एका बाऊलमध्ये बेसन तांदळाचे पीठ, तिखट,हळद, मीठ, धने जीरे पूड, तीळ सर्व मिक्स करून त्यात कोथिंबीर मिक्स केली. इडली पात्रात पाणी घालून उकळत ठेवले.

  3. 3

    सर्व मिश्रण मिक्स करून गरजेनुसार थोडे पाणी घालून सैल सर गोळा करून घेतला.त्यात बेकिंग सोडा, लिंबाचा रस मिक्स करून मिश्रण लगेच ग्रिसींग

    केलेल्या डब्यात घालून इडली पात्रात ठेवून १०-१२मिनीट वाफवून घेतले.

  4. 4

    आता त्याच्या वड्या कट करुन गॅसवर कढई मध्ये तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर तळून घेतल्या. व डीश मध्ये ठेवून गार्निश करून सर्व्ह केल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes