तोंडलीची रस्सा भाजी (Tondlichi Rassa Bhaji Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी

तोंडलीची रस्सा भाजी (Tondlichi Rassa Bhaji Recipe In Marathi)

#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोतोंडली
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. छोटाओल्या नारळाचा तुकडा
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. पाच-सहा लसूण पाकळ्या
  7. छोटाआल्याचा तुकडा
  8. 1/2 चमचाजीरे
  9. 1/2 चमचाराई
  10. 1/2 चमचासाखर
  11. 1/4 चमचाहिंग
  12. 1/2 चमचाहळद
  13. 1 चमचालाल तिखट
  14. 1 चमचाधने जिरा पावडर
  15. चवीप्रमाणे मीठ
  16. 1पळी तेल

कुकिंग सूचना

10मिनिटे
  1. 1

    प्रथम तोंडली स्वच्छ धुऊन उभी चिरून बारीक कापून घेणे तसेच नारळ, मिरची, लसुन व आले यांचे बारीक वाटण करून घेणे.

  2. 2

    गॅसवर तसराळे ठेवून ते गरम झाल्यावर त्यात तेल घालावे व राई, जीरे, हिंग व कांदा फोडणीला घालावा कांदा चांगला शिजल्यावर तयार वाटण मसाला, हळद, साखर, मीठ व धने जीरे पावडर घालून चांगले परतून घ्यावे व नंतर कापलेली तोंडली घालावी.

  3. 3

    चांगलं परतून झाल्यावर वरून बारीक चिरलेला टोमॅटो घालून मिक्स करावे व थोडे पाणी घालून कुकरमध्ये घालून दोन शिट्या घ्याव्यात दोन मिनिटे गॅस बारीक करून बंद करावा.

  4. 4

    कुकर थंड झाल्यावर भाजी सर्व्ह करण्यास रेडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes