साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#Cooksnap
#Breakfast_recipe

साबुदाणा वडा हा माझ्या घरी इतका प्रिय आहे की फक्त उपवासाला करुन चालत नाही तर इतर दिवशी पण breakfast,snacks म्हणून करते. आज मी माझी मैत्रिण @cook_21873900 प्रगती हकीम ताईंची साबुदाणा वडा ही रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली आहे.. ताई साबूदाणे वडे खूपच छान crispy झाले होते .Thank you so much for this delicious recipe.

साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)

#Cooksnap
#Breakfast_recipe

साबुदाणा वडा हा माझ्या घरी इतका प्रिय आहे की फक्त उपवासाला करुन चालत नाही तर इतर दिवशी पण breakfast,snacks म्हणून करते. आज मी माझी मैत्रिण @cook_21873900 प्रगती हकीम ताईंची साबुदाणा वडा ही रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली आहे.. ताई साबूदाणे वडे खूपच छान crispy झाले होते .Thank you so much for this delicious recipe.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
12-15 सर्व्हिंग
  1. 250 ग्रामसाबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून
  2. 300 ग्रामबटाटे उकडून साले काढून मॅश करून
  3. 100 ग्रामशेंगदाणे भाजून जाडसर कूट
  4. 50 ग्रामउपवास भाजणी
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. मीठ चवीनुसार
  7. शेंगदाणे तेल तळण्यासाठी
  8. 3 टेबलस्पूनआलो मिरची कोथिंबीर ठेचा
  9. 1 टीस्पूनसाखर
  10. अर्ध्या लिंबाचा रस
  11. कोथिंबीर
  12. 1/2 टी स्पूनआल्याचे बारीक चिरलेले तुकडे

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम साबुदाणा स्वच्छ धुऊन आठ ते दहा तास भिजत ठेवा.

  2. 2

    बटाटे उकडून मॅश करून घ्या. आलं,. मिरची कोथिंबीर मिक्सरवर जाडसर वाटून घ्या आल्याचे तुकडे करा.कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

  3. 3

    आता एका पसरट भांड्यामध्ये भिजवलेला साबुदाणा, उकडून मॅश केलेले बटाटे, दाण्याचा कूट,जीरे,मीठ,साखर आलं मिरचीचे वाटण,कोथिंबीर,आल्याचे तुकडे, लिंबाचा रस,उपवास भाजणी घालून एकत्र करून मळून ठेवा. हे मिश्रण एक तासभर झाकून ठेवा म्हणजे सर्व पदार्थ नीट मुरतील आणि वडे चविष्ट होतील.

  4. 4

    आता वरील मिश्रणाचे चपट्या आकाराचे वडे तयार करून घ्या.

  5. 5

    आता एका कढईत शेंगदाणा तेल हाय फ्लेमवर तापवून घ्या आणि हाय फ्लेमवरच साबुदाणे वडे दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर तळून घ्या. हाय फ्लेमवर साबुदाणा वडा तळल्यामुळे तो तळताना फुटत नाही.

  6. 6

    तयार झालेले गरमागरम साबुदाणा वडा खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes