साबुदाणा वडा.. (sabudana vada recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#ब्रेकफास्ट
#साबुदाणावडा
साबुदाणा वडा एव्हरग्रीन कधीही चालणारा... कुणालाही हवाहवासा वाटणारा... असा हा पदार्थ...
असं नाही की हा वडा तुम्ही उपवासाच्या दिवशीच बनविला पाहिजे... किटी पार्टी असो किंवा कुठलेही छोटे-मोठे फंक्शन असो, कुठल्याही वेळेला तुम्ही हा साबुदाणा वडा बनवून खाऊ शकता.. आस्वाद घेऊ शकता... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 1 कपभीजवलेला साबुदाणा
  2. 1/2 कपशेंगदाण्याचा कुट
  3. 3-4उकडून घेतलेले पोटॅटो
  4. 5-6हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या
  5. 1 टेबलस्पूनलिंबू रस
  6. 1 टेबलस्पूनजीरे
  7. 1/2 टेबलस्पूनसाखर
  8. सैधव मीठ चवीनुसार
  9. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सात ते आठ तासा पर्यंत साबुदाणा भिजू घालावा. म्हणजे तो चांगला मोकळा होईल.

  2. 2

    भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये शेंगदाणे कुट, जीरे,मीठ, साखर, उकडून मॅश केलेला पोटॅटो, मिरचीचा ठेचा घालून चांगले मिक्स करून गोळा तयार करून घ्यावा.

  3. 3

    भिजवलेल्या गोळ्याचे छोटे छोटे समान भागात गोळे करून घ्यावे. एक गोळा तळहातावर घेऊन मध्येच हलकेसे दाबून चपटे वडे तयार करून घ्यावे.

  4. 4

    कढईत तेल गरम होऊ द्या. तेल गरम झाले कि, त्यामध्ये एक एक करून वडे सोडा, व मिडीयम फ्लेम वरती डीप फ्राय करून घ्यावे. सोनेरी रंगाचे वडे झाल्यावर टिशू पेपर वर काढून ठेवावे. त्यामुळे त्यातील अतिरिक्त तेल निघून जाईल.

  5. 5

    अशाप्रकारे तयार आहे आपला *साबुदाणा वडा*...
    गोड दह्यासोबत किंवा तळलेल्या हिरव्या मिरच्या सोबत गरमागरम साबुदाणा वडे सर्व्ह करा... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes