☘️पालक बटाटा भाजी

P G VrishaLi
P G VrishaLi @Vrishali1958
kolhapur

☘️पालक अत्यंत पौष्टिक भाजी
बटाटा ही सर्वांचा लाडका त्यातल्या त्यात लहान मुलांचा जास्तच🙂
या दोन्हींचे हे सुंदर व चवदार कॉम्बो

☘️पालक बटाटा भाजी

☘️पालक अत्यंत पौष्टिक भाजी
बटाटा ही सर्वांचा लाडका त्यातल्या त्यात लहान मुलांचा जास्तच🙂
या दोन्हींचे हे सुंदर व चवदार कॉम्बो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
2 servings
  1. ☘️साहित्य एक पालक जुडी धुवून निवडून बारीक चिरुन एक बटाटा बारीक काचऱ्या करून दोन मिरच्या मोठें तुकडे करून एक वाटी डाळीचे पीठ फोडणीचे साहित्य व हळद चार पाच लसूण पाकळ्या सोलून व तुकडे करून

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    ☘️कृती
    प्रथम पातेल्यात थोडे तेल घालून बटाटे टाकावेत
    झाकण ठेवून पाच सहा मिनीटे बटाटे अर्धवट शिजवून घ्यावेत.
    यानंतर बारीक चिरलेला पालक घालून परतून घ्यावे

    ☘️भाजी बुडेल इतकेच पाणी घालून झाकण ठेवून पालक शिजवावा
    पालक चटकन शिजतो.
    पालक शिजला की एक वाटी डाळीच्या पीठात पाणी व थोडी हळद घालून थोडी पातळसर पेस्ट करून घ्यावी
    व ती या भाजीवर ओतावी.

    ☘️हे सगळे मिश्रण परत पाच मिनीटे झाकण ठेवून शिजवावे
    आता एका छोट्या कढईत तेल घालून मोहरी हिंगाची फोडणी करावी
    त्यात लसूण चांगला लालसर परतावा
    मिरच्याचे तुकडे घालून

  2. 2

    मिरच्याचे तुकडे घालून परतावे
    आणि ही फोडणी शिजत असलेल्या पालक भाजीवर घालून
    चवीनुसार मीठ घालून भाजी एकत्र करावी

    ☘️दोन मिनिटांनी गॅस बंद करावा.
    ही थोडी घट्टसर भाजी डब्यात द्यायला सुध्दा उत्तम असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
P G VrishaLi
P G VrishaLi @Vrishali1958
रोजी
kolhapur
interested in cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes