ओट्स इडली
#ब्रेकफास्ट
कुकिंग सूचना
- 1
ओट्स म्हणजे जव. आणखी वेगळं काही नाही.यामध्ये फायबर आणि प्रोटीन च प्रमाण जास्त असतं शिवाय एक वाटी ओटमील घेतल्यावर लगेच भूक लागत नाही.हळुहळु पचन होतं त्यामुळे आपोआप वजन कमी करायला मदत होते.
- 2
ओट्स हलके भाजून घ्यायचे सुगंध आल्यावर गॅस बंद करायचा आणि थंड करायचे.
- 3
थंड झाले कि मिक्सरला फिरवून घ्यायचे.खूपबारीक करायचे नाही कारण इडली रवाळ छान लागते जर जास्त बारीक ग्राइंड केले तर इडली चिकट होते
- 4
पॅनमध्ये तेल टाका तेल तापल्यावर मोहरी,कढीपत्ता,उडीद डाळ,चणा डाळ भाजून घ्या.
- 5
आता कांदा घाला आणि थोडावेळ परतवा.
- 6
कांदा झाला कि रवा घाला आणि पाच मिनिट छान भाजून घ्या.
- 7
रवा एका बाऊलमध्ये काढा,त्यामध्ये बारीक केलेली ओट्स,मटार,गाजर,मीठ घाला आणि दही घालून मिक्स करा.
- 8
दही मिक्स केल्यावर थोडं पाणी घालून इडली च्या बॅटर प्रमाणे पातळ झाले पाहिजे.खूपघट्ट नको आणि खूप पातळही नको.इडली च्या मोल्ड मध्ये टाकतांना चमच्याने ड्रॉप पडला कि समजायचं बॅटर जमलं
- 9
इडली पात्रात पाणी घालून उकळायला ठेवा आणि इडली मोल्डला ग्रीसिंग करा.
- 10
उकळी आली कि फ्रुट इनो थोड्या पाण्यात मिक्स करून ऍड करा आणि एकाच दिशेने मिक्स करा
- 11
इनो घातल्यावर लगेच बॅटर वर आल्यासारखे वाटेल.
- 12
मोल्डमध्ये बॅटर सेट करा आणि पात्रात ठेवून.झाकण लावून 15 मिनिट होवू द्या.
- 13
पंधरा मिनिटांनी गॅस बंद करा आणि 10-15 मिनिट थंड होऊ द्या.नंतर सूरी च्या साहाय्याने इडली काढून घ्या.
- 14
काढतांना घाईघाईत काढली तर मोल्डला बरेचदा इडली चिकटते म्हणून थंड झाल्यावर काढायची.
- 15
चार पाच खोबऱ्याचे तुकडे,पुदिना,दोन हिरव्या मिरच्या,लिंबाचा रस,साखर,मीठ घालून मिक्सर मध्ये चटणी वाटून घ्या.
चटणी आणि इडली सर्व्ह करा. - 16
रोज ओट्स मिल एकवेळ जरी घेतले तरी तुम्ही फिट रहाल आणि चवीचं म्हणाल तर ! पौष्टिक पदार्थ हा दिसायला आकर्षक नसतो आणि चवही नसते असा आपला दृष्टिकोन बनला आहे.
- 17
पण ओट्समुळे इडलीला खूप छान चव येते अशी रंगबिरंगी इडली मुलेही आवडीने खातील.बरेचदा मुलं भाजी पोळी खायला टाळतात तुम्हाला टिफिनमध्येही देता येईल.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes




टिप्पण्या