ज्वारीची खिचडी

ज्वारी मध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, प्रथिने, लोह, जीवनसत्व B3 मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे मी आज ज्वारीची खिचडी केली आहे. खूप छान झाली. तुम्ही ही नक्की करून बघा.
पोटभरीचा नाश्ता. वेटलाॅस साठीही उपयुक्त.

कुकिंग सूचना
- 1
ज्वारी निवडून, स्वच्छ धुऊन घेणे. पाणी घालून सात-आठ तास भिजवणे किंवा रात्रभर भिजत ठेवणे. भिजल्यानंतर ज्वारी थोडीशी फुगलेली दिसते.छोटया कुकरमध्ये भिजवलेली ज्वारी व थोडेसे पाणी घालून घेणे. झाकण लावून, 8-9 शिट्टया करून घेणे.
- 2
शिजवलेली ज्वारी ताटलीत काढून घेणे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व हिरवी मिरची बारीक चिरून घेणे. गॅसवर कढई तापत ठेवणे.कढईत साजूक तूप घालून घेणे.
- 3
तापलेल्या तुपात जिरे,हिरवी मिरची व कडीपत्ता घालून घेणे. कांदा घालून गुलाबीसर भाजून घेणे.नंतर टोमॅटो घालून परतणे.
- 4
भाजलेले शेंगदाणे व शेंगदाण्याचा कूट घालून घेणे. लाल तिखट, हळद घालून परतणे.
- 5
शिजवलेली ज्वारी घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे. नंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेणे. एक दोन मिनिटे ठेवून गॅस बंद करणे
- 6
गॅस बंद केल्यानंतर लिंबू पिळून घेणे.चिरलेली कोथिंबीर घालून घेणे. खाण्यासाठी तयार ज्वारीची खिचडी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या