शिळ्या भाताच्या वड्या
भारती संतोष किणी
#ट्रेंडिंग रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सरच्या भांड्यात शिळा भात,बेसन, दही, मिरच्या,आलं,साखर घेऊन ते बारीक करावे व एका भांड्यात काढून त्यात हळद, रवा आणि मीठ घालावे.
- 2
सर्व मटेरियल एकजीव करून दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवावे पंधरा मिनिटानंतर इनो घालावा व चांगले फेटून घ्यावे.
- 3
मिश्रण भेटल्यानंतर ते लगेचच तेल लावलेल्या भांड्यावर टाकून दहा ते पंधरा मिनिटे वाफवून घेणे व थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्या.
- 4
गॅसवर तसरले ठेवून त्यात थोडे तेल घालावे व राई, जिरं,मिरची,तीळ, लाल तिखट ह्याची फोडणी करून तयार वड्या त्यात परकाव्या व वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करण्यास रेडी.
Keywords
Similar Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/26005745
















टिप्पण्या