चॉकलेट चंद्र मोदक (chocolate chandra modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6 #चंद्रकोर चॉकलेट अतिशय प्रिय पदार्थ त्यात चंद्रकोर ही थीम दिल्यापासून चॉकलेट चे काहीतरी करावं ही मनापासून इच्छा होती. यातच सुचलेला हा पदार्थ म्हणजे चॉकलेट चंद्र मोदक. कमीत कमी घटक घेऊन खूप सोपा व चविष्ट असा हा पदार्थ.....

कुकिंग सूचना
- 1
प्रथम 100 ग्राम पाणी उकळण्यास ठेवावे त्यात तेल व मीठ घालावे व छान उकळी आल्यावर त्यात मैदा व तांदळाचे पीठ एकत्र करून घालावं ढवळून एक मिनिटं ठेवून वाफेवर शिजू द्यावे
- 2
नंतर गॅस बंद करावा व दहा मिनिटांनी वाफवलेले पीठ छान हाताच्या तळव्याने मळून घ्यावे तयार पिठाचे दोन वेगळे भाग करावे.एकात थोडी कोको पावडर घालावी व छान गोळा करून घ्यावा
- 3
पांढऱ्या गोळ्या च्या भोवती चॉकलेट च्या गोळ्या ची पारी लावावी व त्याची एक पातळ पारी तयार करून घ्यावी
- 4
मधोमध चमचाभर चॉकलेट चिप्स ठेवावे मग खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे तयार पारीच्या एकाबाजूने पाती करत याव्यात.
- 5
हळूहळू त्याचा चंद्रकोर प्रमाणे आकार होईल. अशाप्रकारे सर्व चंद्रकोर मोदक तयार करून घ्यावे व एका पातेल्यात एका चाळणीवर २० मिनिटे झाकण ठेवून वाफेवर शिजू द्यावे
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (5)