ब्रेड ड्रायफ्रूट करंजी (मिनी)

Kanchan Chipate
Kanchan Chipate @cook_20298781

ड्रायफ्रूट हे शरीरासाठी आवश्यक नि पौष्टीक आहे .परंतु लहान मुले खायला कंटाळा करतात मग अनेक क्लुप्त्या करून त्यांना हे खाऊ घालावे यासाठी आपला अट्टहास असतो .मी ही माझ्या नातीसाठी अशीच एक नाविन्यपूर्ण कल्पना केली व त्यातुनच ब्रेड ड्रायफ्रूट मिनी करंजीचा उगम झाला ....😊☺️😋😊😊 #Goldenapron3

ब्रेड ड्रायफ्रूट करंजी (मिनी)

ड्रायफ्रूट हे शरीरासाठी आवश्यक नि पौष्टीक आहे .परंतु लहान मुले खायला कंटाळा करतात मग अनेक क्लुप्त्या करून त्यांना हे खाऊ घालावे यासाठी आपला अट्टहास असतो .मी ही माझ्या नातीसाठी अशीच एक नाविन्यपूर्ण कल्पना केली व त्यातुनच ब्रेड ड्रायफ्रूट मिनी करंजीचा उगम झाला ....😊☺️😋😊😊 #Goldenapron3

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०/१५मिनिटे
३,४ व्यक्ती
  1. ब्रेड स्लॉईस
  2. ३ टेबलस्पून खोबराकीस
  3. ५,६काजू
  4. ५,६बदाम
  5. ४,५ पिस्ता
  6. अक्रोड
  7. १ टेबलस्पून चारोळी
  8. १ टेबलस्पून खारीकपुड
  9. १ टेबलस्पून तीळ
  10. ३,४ टेबलस्पून गुळ पावडर
  11. १ टेबलस्पून गाईचे तूप
  12. २,३ वेलची
  13. तळण्यासाठी गरजेनुसार तेल
  14. पाणी गरजेनुसार

कुकिंग सूचना

१०/१५मिनिटे
  1. 1

    ब्रेड च्या कडा कापून घेऊन त्याला मिक्सरमध्ये थोडे फिरवून घेतले थोडे पाणी घालून नि तो गोळा मळून ठेवला.

  2. 2

    काजू,बदाम,पिस्ता,अक्रोड,चारोळी हे सर्व मिक्सरमध्ये जाडसर फिरवुन घेतले नंतर त्यात खारीकपूड,वेलची व गुळपुड घालून हलकेच फिरवुन घेतले.

  3. 3

    एका पातेल्यात एक चमचा तुप गरम करून त्यात खोबराकीस घालून हलकेच भाजुन घेतले नि मग त्यात तयार सर्व ड्रायफ्रूट घालून मिक्स केले व गॅस बंद करून थंड होऊ दिले

  4. 4

    तयार ब्रेड गोळा छान मळून घेऊन त्याची हातावरच हलकेच पाती तयार करून त्यात हवे तेवढे तयार ड्रायफ्रूट सारण भरले नि पाणी लावून कडा बंद करून व्यवस्थित दाबुन घेतले. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून मंद आचेवर करंज्या सोनेरी तळून घेतल्या.अश्या तऱ्हेने ड्रायफ्रूट करंज्या बनविल्या नि वरून त्यावर शोभे करिता काळा मनुका ठेवला..🌭

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kanchan Chipate
Kanchan Chipate @cook_20298781
रोजी

Similar Recipes