ड्रायफ्रूट बासुंदी (Dryfruits Basundi recipe in Marathi)

Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07

#Trending
#Basundi
दुधापासून बनवलं जाणारं हे चवदार मिष्टान्न भारतातील पश्चिम भागात म्हणजेच महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकातील काही भागांत अतिशय लोकप्रिय आहे. आज मी तुम्हाला तोंडाला पाणी आणणा-या व प्रत्येक समारंभात अगदी मिटक्या मारुन खाल्ल्या जाणाऱ्या ड्रायफ्रूट बासुंदीची साधीसोपी रेसिपी सांगणार आहे ज्यात मी खव्याचा वापर केला नाही त्यामुळे बासुंदी बनायला थोडासा वेळ जास्त लागेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरदूध
  2. 10 ग्रॅमबदाम
  3. 10 ग्रॅमकाजू
  4. 5 ग्रॅमचारोळी
  5. 10 ग्रॅमपिस्ता
  6. 1 चमचावेलची पावडर
  7. साखर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एक लिटर दूध पातेल्यात तूप घ्यावे त्यानंतर गॅस वरती गरम करायला ठेवावे,दुधाला उकळी आली की पळीने ढवळून घ्यावे आणि त्यात एक वाटी साखर घालावी.

  2. 2

    साखर व्यवस्थित विरघळली की त्या दुधामध्ये चारोळी,काजू,बदाम,पिस्ता त्याचे बारीक काप करून टाकावेत अधून मधून ढवळत राहावे.

  3. 3

    त्यानंतर त्यात वेलची पावडर टाकावी याचा सुंदर सुवास बासुंदी मध्ये येतो. दूध व्यवस्थित आटवावे म्हणजे एक लिटर चे अर्धा लिटर होईपर्यंत दूध आटवून घ्यावे, म्हणजे कोणत्याही प्रकारचा खवा किंवा क्रीम टाकायची गरज भासणार नाही आणि तरीही घट्टसर बासुंदी तयार होते.
    (तुम्ही थोडेसे जायफळ पावडर आणि केशर घालू शकता माझ्याकडे उपलब्ध नव्हते म्हणून मी नाही टाकले.)

  4. 4

    तयार झाली आहे आपली मन तृप्त करणारी चविष्ट बासुंदी! या बासुंदीचा तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे म्हणजेच गरमागरम असताना किंवा थंड करुन देखील आस्वाद घेऊ शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07
रोजी
Royalty of Taste - Delish Masala
पुढे वाचा

Similar Recipes