चोखा /बैंगन का भरता (chokha recipe in marathi)

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai

#उत्तर भारत
#बिहार
लिट्टी चोखा हा उत्तर भारतातील अत्यंत प्रिय खाद्य पदार्थ आहे. एम.ए. हिंदी विषय घेऊन केल्यामुळे युनिवर्सिटीमध्ये माझे बरेच उत्तर भारतीय मित्र मैत्रिणी होत्या, आणि त्यांच्या डब्ब्यात हमखास हे व्यंजन असायचे. लिट्टी गहू आणि सातूच्या पिठीपासून बनते. यांत राईच्या तेलाचा उपयोग केला जातो. आपल्याला त्याची तशी सवय नसल्याने कधी कधी ॲसिडीटी होते( असा माझा बापुडीचा अनुभव) .. चोखा भाजलेल्या टोमॅटो किंवा भाजलेल्या टोमॅटो व वांग्याचा असतो.
इथे मी लिट्टी नाही पण चोखा दाखवते...
सहज सोप्प्या भाषेत चोखा म्हणजे वांग्याचे भरीत ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ व्यक्तींसाठी
  1. 1मोठे वांगे
  2. 2टोमॅटो
  3. 2कांदे
  4. 7-8लसूण पाकळी
  5. 2मिरची
  6. 5-6कढीपत्ता पाने
  7. 1/4 कपओले वाटाणे
  8. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  9. 1/4 टीस्पूनमोहरी
  10. 1/4 टीस्पूनजीरे
  11. 1/4 टीस्पूनहिंग
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. 1/2 टीस्पूनधणे जीरे पावडर
  14. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  15. 1/4 कपशेंगदाणे कूट (ॲाप्शनल... कारण ओरिजनल रेसिपी मध्ये नसते. पण आपला मराठी टच हवा असेल तर घाला)
  16. चवीनुसार मीठ
  17. 2 टेबलस्पूनदही (हे ही ॲाप्शनल)
  18. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    वरती साहित्य लिहीले आहे, ते पहिल्या दोन स्टेप मध्ये दर्शविले आहे. वांगे भाजताना त्याला मधोमध चिरून घ्या, म्हणजे किड वगैरे असेल तरी दिसेल, आणि आत पर्यंत छान भाजले जाईल. वरून तेलाचा हात फिरवा म्हणजे त्याचे साल सहज निघते.

  2. 2

    मी दोन टोमॅटो घेतली आहेत, त्यातील एक चिरणार आहे, दुसरे भाजणार आहे.

  3. 3

    तर जाळीवर मध्यम आचेवर वांगे व टोमॅटो भाजून घ्या. आणि एका भांड्यात वर झाकण ठेवून बंद करा. म्हणजे त्याचा स्मोकी फ्लेवर्स टिकून राहिल.

  4. 4

    १५-२० मिनिटांनी भांड्यावरचे झाकण उघडा आणि वांगे व टोमॅटो चे साल हळूवारपणे काढून टाका.

  5. 5

    नंतर मिक्सरच्या भांड्यातून वांगे व टोमॅटो वाटून घ्या. फोर्कच्या सहाय्याने मोडले तर ॲाथेंटीक टेस्ट मिळेल. कढईत साधारण १ टेबलस्पून तेल घ्या. मध्यम आचेवर ते गरम करून फोडणी करून घ्या. (राईचे तेल चालतं असल्यास उत्तम) फोडणी तडतडली की मिरची व लसूण परतून घ्या.

  6. 6

    लसूण सोनेरी झाला की यांत कढीपत्ता व थोडीशी कोथिंबीर घालून पून्हा परतून घ्या. यांत वाटाणे, कांदा व टोमॅटो एकत्रित घालून नरम होऊ द्या. कांदा नरम झाला की यांत हळद, लाल मिर्च, धणे जीरे पावडर व मीठ घालून एकजीव करा.

  7. 7

    यांवर वांगे, टोमॅटो चे मिश्रण घालून परतून घ्या. हवे असल्यास दाण्याचे कूट वापरा. वरून कोथिंबीर पेरा आणि गॅस बंद करा. चोखा रेडी...

  8. 8

    लिट्टी नाही पण मी बाजरे की रोटी सोबत तुमच्यासाठी चोखा सर्व्ह करते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

Similar Recipes