झटपट व टिकाऊ कैरी चटणी (Kairi Chutney Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

विकेंड रेसिपी

उन्हाळ्यात कैऱ्या आल्या कीं, त्यांचे अनेक प्रकार बनविले जातात . चटकन होणारी व वर्षभर टिकणारी, कैरीचे रस्सेदार चटणी बनवलीय . हल्लीच्या वेगवान जीवनात वेळ कुणालाच नसतो . त्यामुळे झटपट रेसिपीज, सर्वजण पसंत करतात .ही चटणी चटकदार व मस्त लागते .विकेंड ची ही रेसिपी आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केली त्याची कृती पाहू ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिटे
8 ते 10 व्यक्ती
  1. 2कैऱ्या मध्यम आकाराच्या
  2. दीडशे ग्रॅम किसलेला गुळ
  3. दीड टीस्पून जीरे
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. चवीपुरते मीठ
  6. 1/4 टीस्पूनहिंगपूड

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    कैऱ्या स्वच्छ धुऊन पुसून कोरड्या करा व त्या सोलण्याने सोलून घ्या.सोललेल्या कैऱ्या किसून घ्या.

  2. 2

    कैरी किसा मध्ये, लाल तिखट, मीठ, जीरे, हिंग पूड व गूळ घालून मिश्रण छान मिक्स करा व भांड्यात ओता.भांड्यावर गच्च झाकण झाका. म्हणजे त्यात पाणी जाणार नाही. भांडे कूकर मध्ये ठेवून 3 शिट्ट्या करा.

  3. 3

    कुकरची वाफ गेल्यानंतर वाफवलेले मिश्रण 2 - 4 मिनिटे गॅसवर शिजवा.
    गार झाल्यानंतर बरणीत भरा. चटपटीत आंबट गोड कैरीची चटणी तयार !! ही वर्षभर टिकते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

टिप्पण्या

Similar Recipes