खमंग श्रावणी घेवडा (Shravani Ghevda Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#SSR

श्रावण आला कीं , कोवळा , हिरवागार लुसलुशीत घेवडा सर्वत्र आढळतो . अगदी चटकन होणारा व चवीलाही खमंग लागणारा श्रावणी घेवडा !!
ही भाजी श्रावणात आवर्जून केली जाते .
चला त्याची कृती पाहू

खमंग श्रावणी घेवडा (Shravani Ghevda Recipe In Marathi)

#SSR

श्रावण आला कीं , कोवळा , हिरवागार लुसलुशीत घेवडा सर्वत्र आढळतो . अगदी चटकन होणारा व चवीलाही खमंग लागणारा श्रावणी घेवडा !!
ही भाजी श्रावणात आवर्जून केली जाते .
चला त्याची कृती पाहू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंगस
  1. 1/4 किलोघेवडा
  2. दीड टेबलस्पून शेंगदाणा कूट
  3. 1 टीस्पूनकाळा मसाला
  4. 1/4 टीस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टीस्पूनधणे जीरे पूड
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. चवीपुरते मीठ
  8. चिमूटभरहिंग
  9. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  10. 5-6कढीपत्ता पानं
  11. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    घेवडा आधी स्वच्छ धुऊन घ्या.त्याच्या शिरा काढून,तो निवडून घ्या.

  2. 2

    गॅसवर कढईत, फोडणीसाठी तेल तापवा.त्यांत हिंग, जीरे,मोहरी टाका. ती तडतडल्यानंतर फोडणीत, कढीपत्ता,हळद आणि लाल तिखट टाका.त्यातच निवडलेली शेंग टाका. वरून काळा मसाला,धने जिरेपूड, शेंगदाण्याचा कूट व मीठ टाका. छान मिक्स करा. गॅसच्या बारीक फ्लेमवर ती 5 -10 मिनिटे वाफू द्या.
    वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका..
    गरम गरम सर्व्ह करा व लुसलुशीत खमंग भाजीचा आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes