कुकिंग सूचना
- 1
दुधी व गाजर सोलून जाड किसणीने किसून घ्यावीत. किंवा बारीक चिरून घ्यावेत. हिरव्या मिरचीचे आवडीप्रमाणे तुकडे करावेत.
- 2
तेल गरम करून त्यात राई, जिरे, हिंगाची फोडणी करावी. त्यात हिरवी मिरची घालून परतावी. त्यात दुधीचा किस घालून वाफ काढावी.
- 3
दुधीचा किस अर्धा कच्चा शिजल्यावर त्यात गाजराचा किस व सुके मसाले, मीठ घालून एकत्र करावे. वरती झाकण ठेवून वाफ घ्यावी.
- 4
या किसात शेंगदाण्याचे कूट घालून एकत्र करावे.
- 5
आता वरून ओले खोबरे घातले की झाली तयार दुधीची व गाजराची कोसंबरी.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12246774












टिप्पण्या