कोलंबीची मॉली (kolambi mauli recipe in marathi)

कोलंबी अतिशय आवडता मत्स्यप्रकार.त्याचे विविध प्रकार पाहून आश्चर्यच वाटते. कोणत्याही मसाल्यात करा,ती चवदार होणारच. ओलं खोबरं वापरा की सुकं खोबरं; लाल तिखट वापरा की गरम मसाला;कच्चा मसाला वापरा की भाजून वाटण करा;हिरवा मसाला वापरा की लाल मिरच्या वापरा;चिंच वापरा की कोकम वापरा की कैरी वापरा; खोबरं वाटून वापरा किंवा त्याचं दूध कडून वापरा किंवा खोबरं न वापरता करा. तिची चव प्रत्येकाशी जमवून घेत खुलते. असाच हा एक केरळी प्रकार. खोबरं न वापरता केलेला.
केरळ माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे,मी दोनदा केरळला भेट दिली आहे,केरळला देवभूमी असं सार्थ नामाभिधान आहे आणि प्रमेश्वराच्या दुसऱ्या अवतारचा तिथे मुक्त संचार आहे.केरळचे दैवी सौंदर्य आणि ताजे मासे ही दोनच करणे मला केरळला वारंवार भेट द्यायला पुरेशी आहेत.
के डी टी सी च्या गेस्टहाऊसमधले खानसामा घरगुती पद्धतीचे जेवण बनवण्यात पटाईत असतात.त्यात बोटीवर राहिलात तर तुमच्यासमोरच मासे पकडून,उत्तम शिजवून दिले जातत.त्यातलाच एक प्रकार म्हणजे मॉली.खोबरं न वापरता केलेला.लवंगा ,कालिमिरचा भरपूर वापर असतो,कारण कोलंबीची गोडसर चव,त्यात कांदा टोमॅटोची भर त्यामुळे गरम मसाल्याचा तिखटपणा हवाच.तरीही आता इतकं तिखट आम्ही खात नाही,म्हणून मी लवंगा आणि काळीमिरी कमी वापरते.तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर चार लवंगा,5 ग्रॅम मोहरी आणि 5 ग्रॅम काळीमिरी जास्त वापरा.
मॉली म्हणजे थपथपीत अंगाारसा रस असलेली माशाची आमटी.त्यात ती कोलंबीची असेल तर पहायलाच नको.गरमागरम वाफाळता भात आणि कोलंबीची मॉली म्हणजे देवभूमीतले स्वर्गसुखच!
मला अतिशय आवडतो.तुम्हाला आवडतो का ते पहा.
घ्या तर साहित्य जमवायला.

कुकिंग सूचना
- 1
कोलंबी सोलून आतला काळा दोरा काढून साफ करा नि स्वच्छ धुऊन घ्या.कांदे उभे पातळ चिरून घ्या.टोमॅटोला सुरीने + आकारात काप देऊन उकळत्या पाण्यात मिनिटभर सोडून गॅस बंद करा.
- 2
टोमॅटो लगेच थंड पाण्यात टाक.त्यामुळे त्याची साल लगेच सुटते.
- 3
टोमॅटो सोलून,मिरचीपूड, धणेपूड, हळदपूड, राई, लवंग, कालिमिरी,हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या घालून त्यासोबत बारीक वाटा.
- 4
कढई किंवा पातेल्यात तेल गरम करून त्यात कांदे परता.
- 5
वाटलेला मसाला मीठासाहित त्यात घाला. मसाल्याला तेल सुटेपर्यंत परता.
- 6
मसाला तेल सोडुबलागला की कढीपत्ता व कोलंबी घालून परता.
- 7
चार वाट्या गरम पाणी घाला.यात टोमॅटो उकडलेले पाणी आधी किती आहे ते मोजून घ्या आणि मग बाकीचे पाणी वाढवा. शिजेपर्यंत उकळा.
- 8
उकळून रस अंगासरसा ठेवा.कोथिंबीर घालून सादर करा.गरमागरम वाफाळता भात,चपाती ब्रेड, पुरी, पानपोळे, अंबोळ्या कशाहीबरोबर आस्वाद घ्या.माझी आवड गरमागरम वाफाळता भात.
Similar Recipes
More Recipes
- चिकन काळा रस्सा... मराठवाडा (महाराष्ट्र) (chicken kala rassa recipe in marathi)
- शेजवान हाका नूडल्स (schezwan recipe in marathi)
- कोल्हापूर ची - तर्री मिसळपाव (kolhapuri misal recipe in marathi)
- आॅमलिझ्झा (आॅमलेट पिझ्झा) (omlet pizza recipe in marathi)
- स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)

टिप्पण्या