सुरणाची चंद्रकोर (suran cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर थीम मिळाली आणि नवी मुंबईला लॉक डाऊन समोर उभा राहिला पण जेव्हापासून कुकपॉडला जॉईन झालो तेव्हा पासून घरात जे असेल त्यातून काही वेगळं बनवायची इच्छा निर्माण झाली आहे. आता उघडला फ्रिज तर समोर सुरण दिसला मग म्हटलं बनवू ह्याच्या चंद्रकोर आणि माझा हातून जन्मली सुरणाची चंद्रकोर

कुकिंग सूचना
- 1
प्रथम सुरण आणि आणि बटाटे उकडून घ्यावे.
- 2
आता उकडलेल्या सुराणावर कोकमाचा आगुळ घालून सुरण कुस्करून घ्यावा.
- 3
या कुस्करलेल्या सुरणात शिजवलेले बटाटे कुस्करून घ्यावेत यात चिरलेला कांदा, भाजलेला रवा, चिरलेली कोथिंबीर,उकडलेले मटार,आलं-लसूण पेस्ट, गरम मसाला,लाल तिखट,धने-जिरेपूड, हळद,हिंग, मीठ घालून सगळं एकत्र करून घ्यावे.
- 4
तयार मिश्रणाचे चंद्रकोरीच्या आकाराचे किंवा गोल आकाराचे चपटे गोळे करून ते रव्यात घोळवून पाच ते दहा मिनिटे हे अलटून पलटून शालो फ्राय करून घ्यावेत.
- 5
आता तयार आहे आपल्या सुरणाची चंद्रकोर किंवा सुरणाचे कटलेट.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)