चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#रेसिपीबुक #week6
चंद्र आणि चंदकोर यांना मराठी संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. आपण लहानपणापासूनच चांदोमामाच्या गोष्टी व गाणी ऐकत आलेलो आहोत त्यामुळे आपले लहानपणापासूनच आपल्या चंद्राशी नाते आहे आणि या चंद्रकोर थीमला अनुसरून मी आज चीज गार्लिक ब्रेड केला आहे.

चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6
चंद्र आणि चंदकोर यांना मराठी संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. आपण लहानपणापासूनच चांदोमामाच्या गोष्टी व गाणी ऐकत आलेलो आहोत त्यामुळे आपले लहानपणापासूनच आपल्या चंद्राशी नाते आहे आणि या चंद्रकोर थीमला अनुसरून मी आज चीज गार्लिक ब्रेड केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपगव्हाचे पीठ /कणिक
  2. 1/2 कपकोमट दूध
  3. 1 1/2 टेबलस्पून ड्राय इस्ट
  4. 1 टेबलस्पूनसाखर
  5. 1 टेबलस्पूनचिलीफ्लेक्स
  6. 1 कपचीज
  7. 1 टेबलस्पूनबटर
  8. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  9. 1 टेबलस्पूनकिसलेला लसुण
  10. 1 टेबलस्पूनतेल
  11. 1/2 टीस्पूनमीठ
  12. 1 टेबलस्पूनइटालिक सिलिंग
  13. 1/2 टेबलस्पूनगार्लिक पावडर

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    एका बाऊलमध्ये कोमट दूध घेऊन त्यामध्ये एक चमचा साखर घालून मिक्स करून घ्यावे आणि त्यात ऍक्टिव्ह घालून मिक्स करून घ्यावे 15 मिनिटे बाजूला ठेवावे. दुसऱ्या भांड्यामध्ये कणीक, मीठ चाळून घ्यावे त्यात ईस्ट मिश्रण घालावे आणि एकत्र करून गोळा मळून घ्या.

  2. 2

    नंतर यात चिली फ्लेक्स किसलेला लसूण आणि तेल घालून मळून घ्या आणि ओल्या फडक्याने किंवा प्लास्टिकने कव्हर करून 1 तास बाजूला ठेवा.

  3. 3

    आता ओट्यावर (काऊंटर) किंवा एका परातीमध्ये कोरडे पीठ टाकून घ्या आणि गोळा परत एकदा मळून घ्या गोळ्याला गोल आकार द्या आणि लाटण्याने गोलसर आकारात लाटून घ्या एका बाजूला चीज घाला आणि दुसरी बाजू त्यावर कव्हर करून सील करून घ्यावी. जर यात एअर बबल वाटत असतील तर टूटपिकने होल करावेत आणि वरील बाजू खाली येईल अशाप्रकारे बेकिंग ट्रेमध्ये ठेवावे नंतर परत यावर ओले फडके घालून 15 ते 20 मिनिटे ठेवावे.

  4. 4

    ओव्हन प्रिहीट करावा 180 सेल्सिअस एका बाऊलमध्ये बटर घ्यावे त्यात चिरलेली कोथिंबीर घालावी आणि तीस सेकंद मायक्रोवेव्ह करून घ्यावे आता हे मिश्रण ब्रेडवर चमच्याने घालावे आणि ब्रशनी हळूहळू पसरवावे नंतर सुरीच्या साह्याने हलकेसे ब्रेडला कट मारून घ्यावे जास्त मोठे कट मारू नये असे केल्यास चीज बाहेर येईल. नंतर यावर इटालीक सिलिंग गार्लिक पावडर घालून बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये 25-30 मिनिटे ठेवावं नंतर चंद्रकोर आकाराचा ब्रेड बाहेर काढून कट करावा आणि गरमागरम सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes