बिरीस्ता सूप (birista soup recipe in marathi)

बिरीस्ता म्हणजे खरपूस तळलेला कांदा.
बिरीस्ता सूप म्हणजे फ्रेंच ओनीयन सूपचं देशीकरण आणि त्यातही कोकणीकरणं आहे.हे चवीला तर उत्तम लागतंच, पण आजारातून उठल्यावर, कमी झालेली शक्ती भरून येण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो.
लहान मुलं आजारी असली की त्यांना जेवू घालणं फार कठीण काम असतं, अशावेळी हे सूप मोलाचं काम करतं आणि मुलांसोबत आईलाही खुश करतं.जर मोठी माणसं आजारी असली आणि साखर,मिठाचं पथ्य असलं तर ते वगळुनही हे सूप बनवता येतं, आणि तरीही अगदी चविष्ट बनतं.फक्त अशा वेळी तूप कमी वापरून कांदा न तळता भाजून घ्या.हे सूप बनवणं अगदी सोपं आहे.माझ्या स्वयंपाकघरातली हिट डिश आहे हे सूप म्हणजे.
यासाठी नारळाचं दूध तुम्ही कवडीच्या खालच्या भागातलं खोबरं वापरलं तरी चालत., मात्र हे दूध ताजंच वापरा.ही खास सुचवणी.
घ्या तर साहित्य जमवायला.

कुकिंग सूचना
- 1
तुपात उभा चिरलेला कांदा सोनेरी,तपकिरी रंगावर तळून घ्या.
- 2
मिक्सरमधून मुलायम वाटण करुन घ्या.
- 3
कांदा तळून उरलेल्या तुपात लवंग, दालचिनीची फोडणी करून त्यात कांद्याची पेस्ट घालून,परता.लगेच नारळाचे पातळ दूध घालून उकळू द्या
- 4
नारळाचे घट्ट दूध घालून उकळेपर्यंत ढवळत रहा.मीठ,मिरपूड घालून गॅस बंद करा.
- 5
गरमागरम आस्वाद घ्या.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)