चंद्रकला (chandrakala recipe n marathi)

Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709

#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर

चंद्रकला (chandrakala recipe n marathi)

#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीमैदा
  2. 2 चमचेमोहन
  3. 1/2 लिटरतळण्याकरता तेल
  4. 7-8 काजू व बदामाचे काप
  5. 1/4 वाटीसाखर
  6. 1+1/2 कप खोऊन घेतलेला नारळ
  7. वेलची पूड
  8. भिजवण्यापुरते पाणी
  9. 1 वाटीसाखर पाका करता
  10. 3 ग्लासपाणी

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    सारण तयार करण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये एक चमचा तूप व खोवलेला नारळ घालून परतून घ्यावे

  2. 2

    त्यामध्ये साखर घालून नीट हलवुन घ्यावे, मिश्रण घट्ट होऊ न देता त्यामध्ये वेलची पूड घालून थंड करायला ठेवावे

  3. 3

    मिश्रण थंड होईपर्यंत कणिक मळून घ्यावे, त्यामध्ये मैदा मोहन घालून त्यात पाणी घालुन नीट मळून घ्यावे.

  4. 4

    अर्धा तास भिजवून ठेवल्या नंतर त्याला गोल आकार लाटावे, व त्यावर सारण भरून त्यावर अजून एका गोल आकाराची काप ठेवावी

  5. 5

    त्याला कडेने आकार देत जावे व नीट बंद करावे.

  6. 6

    तेल तापत ठेवावे, तळताना तेल जास्त गरम असू नये याची काळजी घ्यावी, बनवलेले चंद्रकला नीट खरपूस तळून घ्यावे.

  7. 7

    तळलेले चंद्रकला बनवलेल्या साखरेच्या पाकात टाकावे व दहा ते पंधरा मिनिटांनी खायला सर्व्ह करावे.

  8. 8

    अर्धा तास कणिक भिजून ठेवलेले असताना साखरेचे पाक तयार करावे व थंड करायला ठेवावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709
रोजी

Similar Recipes