लॉकडाऊन कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
लॉकडाऊन कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक वाटी ओले खोबरे किसून घ्यावे त्यानंतर ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
- 2
आता एका डिश मध्ये किसलेला नारळ,दूध पावडर, पिठीसाखर,वेलची पूड एकत्र करून घ्यावे एकत्र करून घ्यावे. एकत्र करून त्याचे दोन गोळे करा व त्या गोळ्या मधला एक गोळा मोठ्या आकाराचा एक गोळा छोट्या आकाराचा करावा. छोट्यागोळ्याला खाण्याचा रंग घालून मिक्स करून घ्यावे.
- 3
आता छोटा गोळा फाईल पेपरवर तूप लावून लाटण्याच्या साह्याने लाटून घ्यावा लाटताना लाटणीला देखील तूप लावून घ्यावे. व त्यावर बारीक चिरलेले ड्रायफूट पसरून घ्यावे हलक्या हाताने ते ड्रायफ्रुट्स दाबून घ्यावे. लाटलेला गोळा फॉइल पेपर च्या साह्याने रोल करत जावा व हलक्या हलक्या हाताने दाबून घ्यावा, पूर्ण गोल करून हाताच्या साह्याने त्याला दाबून व्यवस्थित गोल करून घ्यावे.
- 4
तयार झालेला एक रंगीत रोल बाजूला ठेऊन दुसरा पांढरा गोळा सुद्धा सेम लाटणे व फॉइल पेपर ला तूप लावून लाटून घ्यावा. यावर तयार रंगीत रोल ठेवून फाईल पेपर च्या साह्याने रोल करून घ्यावा.
- 5
आता तयार रोल फॉइल पेपर मधे गुंडाळून एक ते दोन तासांसाठी फ्रीजमध्ये ठेऊन द्यावा.
- 6
दोन तासाने रोल फ्रीजमधून बाहेर काढून धारदार चाकूने त्याचे छोटे-छोटे तुकड़े करून घ्यावे. आता तयार आहे आपली लोकडाऊन कोकोनट बर्फी खाण्यासाठी तयार.
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या