ब्रेड सुशी चाट (bread sushi chaat recipe in marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#रेसिपीबुक #week9 सुशी ही तयार व्हिनेगरच्या भाताची एक जपानी डिश आहे, त्यात सहसा थोडी साखर आणि मीठ असते. ज्यामध्ये सीफूड, बर्‍याचदा कच्च्या भाज्या आणि कधीकधी उष्णकटिबंधीय फळं असे अनेक प्रकारचे पदार्थ असतात.
मी ह्यात चाटप्रकार आणि ब्रेड वापरुन हि रेसिपी मजेशीर बनवली आहे.

ब्रेड सुशी चाट (bread sushi chaat recipe in marathi)

#रेसिपीबुक #week9 सुशी ही तयार व्हिनेगरच्या भाताची एक जपानी डिश आहे, त्यात सहसा थोडी साखर आणि मीठ असते. ज्यामध्ये सीफूड, बर्‍याचदा कच्च्या भाज्या आणि कधीकधी उष्णकटिबंधीय फळं असे अनेक प्रकारचे पदार्थ असतात.
मी ह्यात चाटप्रकार आणि ब्रेड वापरुन हि रेसिपी मजेशीर बनवली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हींगज
  1. सुशीसाठी
  2. 2ब्रेड स्लाईस
  3. 1/4 कपकोथिंबीर
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  6. चवीनुसारमीठ
  7. 1लाल सिमला मिरची
  8. 1पिवळी सिमला मिरची
  9. 1गाजर
  10. 2टिस्पून तेल
  11. रगड्यासाठी
  12. 1 कपशिजवलेले पांढरे वाटाणे
  13. चवीनुसारमीठ
  14. 1/4 टीस्पूनहळद
  15. 3 टीस्पूनतेल
  16. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  17. चिंच चटणीसाठी
  18. 1/4 कपचिंच
  19. 1/4 कपगुळ
  20. 1 टीस्पूनजिरेेेपूड
  21. सजावटीसाठी
  22. बारीक शेव

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    एका कढईत तेल घेऊन ते तापल्यावर त्यात वाटाणे घालावे. जरा परतून मग त्यात आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे. हा झाला रगडा तयार.

  2. 2

    कोथिंबीर, मिरची, आलं लसूण पेस्ट आणि मीठ घालून चटणी करुन घ्यावी. चिंच कोळून त्यात गुळ आणि जिरेपूड घालावी. सुशीसाठी ब्रेड स्लाईस घेऊन त्याच्या कडा काढाव्या आणि लाटण्याने लाटून लाटून घ्यावी.

  3. 3

    एका कढईत तेल घेऊन ते तापल्यावर त्यात लाल, पिवळी सिमला मिरची आणि गाजर घालून व्यवस्थित परतून घ्यावे. मग त्यात आलं लसूण पेस्ट आणि मीठ घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे. जास्त शिजवू नये.

  4. 4

    मग लाटलेल्या ब्रेडवर हिरवी चटणी आणि चिंच चटणी लावावी. आणि तयार भाजी एका कडेला ठेवावी. आणि ब्रेडचा रोल करावा. तयार रोल कापून तो प्लेटमधे पसरवलेल्या रगड्यावर ठेवावा. चटण्या घालून आणि शेव भुरभुरून डिश सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes