कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पुरणासाठी चण्याची डाळ स्वच्छ धुवून 5-6 तास भिजत ठेवावी. मग कुकर मध्ये चण्याची डाळ, हळद, तेल, टाकून 4-5 शिट्ट्या काढून घेणे. कुकर थंड झाल्यावर. चण्याची डाळीचे पाणी काढून घेणे. मग चण्याची डाळ मिक्सरमध्ये वाटून घेणे. गूळ किसून घेणे.
- 2
एका भांड्यात 1वाटी मैदाच पीठ आणि मीठ, तेल घालून. पीठ मळून घेणे. १० मिनीटे झाकून ठेवावे.
- 3
एका पॅनमध्ये एक वाटी गूळ घालून मंद आचेवर गूळ वितळून द्या. मग त्यात पुरण टाका. आणि एकजीव करून घ्या. मग मंद आचेवर पुरण शिजवावे. एक दोन मिनिटाने पुरण परवून घ्या. पुरण खुप कोरडे व कडक करु नका.
- 4
१० मिनीटे झाल्यावर पीठात थोडस तेल टाकून पुणा एकदा पीठ मळुन घ्या. आता पुरण भरण्यासाठी, पीठाचे छोटे गोळे घेऊन पुरी पेक्षा थोडी पोळी लाटा, मग त्यावर पुरण ठेऊन वरून दुसरी चपाती ठेवा.
- 5
मिश्रण भरुन झाल्यावर हाताने पोली गोल करुन घ्या. पोली लाटून घ्या. हाताने पोली गोल केल्याने पुरण सगळ्या बाजुला पुरण पसरतो आणि लाटायला पण सोप जत.
- 6
चपाती च्या तव्यावर पुरणपोळी शिकून घ्या. शिकून झाल्यावर वरून तूप लावा.
- 7
गरम गरम पुरणपोळी वर तुप लावा आणि सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
























टिप्पण्या (4)