गाजराचा मुरब्बा (gajaracha muramba recipe in marathi)

गाजर ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरले जाते. गाजर चवीला गोड असते. गाजरामध्ये अ जीवनसत्त्व असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी गाजर उपयुक्त असते.नियमितपणे गाजर खाल्ल्याने जठरांमध्ये होणारा अल्सर आणि पचनाचे विकार टाळले जातात. गाजरामध्ये आम्ल घटक असतात जे शरीरातील आम्लाचे प्रमाण संतुलित करून रक्त शुद्ध करते. गाजरामध्ये पोटॅॅशियम असते जे रक्तदाब वाढवण्यास मदत करते. गाजरामध्ये कॅरोटीनॉड्स असतात जे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
गाजराचा हलवा तर आपण नेहमीच बनवतो पण आज मी तुम्हाला गाजराचा मुरब्बा कसा बनवायचा ते सांगणार आहे.

कुकिंग सूचना
- 1
गाजर स्वच्छ धुऊन, सोलून एक इंची तुकड्यांमध्ये कापून घ्या.
- 2
एका भांड्यात तीन कप पाणी उकळून घ्या, पाणी उकळल्यानंतर त्यात कट केलेले गाजर टाका आणि दोन मिनिटे शिजवून घ्या, दोन मिनिटानंतर झाकण ठेवून ते पाच मिनिटे तसेच राहू द्या.
- 3
पाच मिनिटानंतर गाळणी च्या मदतीने गाजरातील पाणी गाळून घ्या, आणि गाजर दोन मिनिटां करता थंड पाण्यात टाकून ठेवा.
- 4
दोन मिनिटानंतर परत गाजरातील पाणी काढून घ्या आणि ते एका रुमालावर पसरवून त्यातले पाणी पुसून घ्या. आता गाजराला काट्या च्या साह्याने होल करा आणि एका भांड्यात काढून घ्या. त्यात साखर साखर टाकून ते झाकून दोन-तीन तास तसेच राहू द्या.
- 5
तीन तासानंतर तुम्ही बघाल गाजराचा ज्यूस बाहेर आलेला असेल आणि साखर सुद्धा विरघळलेली असेल. आता गाजराला तयार झालेल्या पाकात शिजवण्यास ठेवा.
- 6
एका प्लेट मध्ये एक थेंब पाक टाका. थंड झाल्यावर चेक करा, जर पाक एकतारी तयार झाला असेल म्हणजे आपले गाजर शिजलेले आहे, आता गॅस बंद करा. आणि दोन मिनिटानंतर त्यात लिंबाचा रस टाकून चांगले मिक्स करा.
- 7
आपला गाजराचा मुरब्बा तयार आहे, (थंड झाल्यावर जर गाजराच्या ज्यूस मुळे आपला पाक परत पातळ झाला असेल तर त्याला परत थोडे शिजवून घ्या) एका कोरड्या काचेच्या डब्यात भरून ठेवा आणि जेवताना साईड डिश म्हणून सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या