वेजिटेबल स्प्रिंग रोल (vegetable spring roll recipe in marathi)

वेजिटेबल स्प्रिंग रोल (vegetable spring roll recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात पहिले कोबी, शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर व लसून अद्रक हे सर्व कापून घेणे.
- 2
स्प्रिंग रोल शीट तयार करुन. पीठ थोडं घट मळून देऊ. 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवा. मग 5 मिनिटं झाल्यावर. पीठाचे छोटे गोळे करून घेऊ. पुरीच्या आकाराने चपाती लावून घेऊ. मग एक चपाती ठेवून त्यावर मैदा शिंपडा पुन्हा त्यावर चपाती ठेवून. पातळ मोठी चपाती लाटून घेऊन. आणि तवा गरम झाल्यावर त्यावर चपाती ठेवून कच पक चपाती भाजून घेऊन. मग गॅस बंद करून. चपाती थड झाल्यावर हलक्या हाताने एकावर एक चपाती लाटलेले काढून घेऊ.
- 3
पॅन गरम करायला ठेवू. मग त्यात 1 टीस्पून तेल टाकून. मग त्यात आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबिरीच्या काड्या टाकून परतून घ्या. मग त्यात कोबी, कांदा, फरसबी, शिमला मिरची कोथिंबिरी सर्व टाकून दोन-तीन मिनिटं परतून घ्या. मग त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, विनिगर आणि मीठ टाकून परतून घ्या. मग त्यात मॅगी मसाला आणि मेगी टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे. आणि दोन मिनिटं परतुन द्या आणि गॅस बंद करा. आणि मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवा.
- 4
आता आपण स्प्रिंग रोल शीट वर मिश्रण ठेवून. चित्रात दाखवल्याप्रमाणे रोल करून घेऊ. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेऊ. तेल गरम झाल्यावर स्प्रिंग रोल दोन टाकून तळून घेऊ. असेच सर्वे स्प्रिंग रोल तळून घेऊ.
- 5
स्प्रिंग रोल
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या (6)